शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

दिल्लीकरांना घडणार 'तिरुपती बालाजी'चं दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2015 18:24 IST

दिल्लीकरांच्या भेटीसाठी पहिल्यांदाच खास आंध्रपदेशातील तिरुमल्ला येथून 'तिरुपती बालाजी' अवतणार आहे. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये दहा दिवसांच्या

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दिल्लीकरांच्या भेटीसाठी पहिल्यांदाच खास आंध्रपदेशातील तिरुमल्ला येथून 'तिरुपती बालाजी' अवतणार आहे.  येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये दहा दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये 'तिरुपती बालाजी' चे मंदिर हुबेहुब साकारले जाणार आहे. 
आत्तापर्यंत आंध्रप्रदेशातच तीन ठिकाणी  'तिरुपती बालाजी' चे हुबेहुब मंदिर साकारण्यात आले होते. आत्ता आंध्राबाहेर दिल्लीत पहिल्यांदाच असे मंदिर बांधण्यात येणार आहे. मंदिर बांधण्यासाठी दगडाचा वापर करण्यात येणार नसून तिरिमल्ला तिरुपती देवस्थान हे साकारणार आहे.
दिल्लीत मंदिर बांधणीच्या तयारीसाठी लागणारे वेगवेगऴे साहित्य घेवून २५ ट्रक दाखल झाले आहेत. तसेच मंदिर सजवणारेही दिल्लीत दाखल झाले आहेत. आम्हाला असे वाटते की, दिल्लीतील बालाजी भक्तांना हुबेहुब तिरुपतीमधील बालाजी मंदिराचाच अनुभव आला पाहिजे, असे तिरिमल्ला तिरुपती देवस्थान समितीचे सदस्य भानू प्रकाश रेड्डी यांनी सांगितले. 
तसेच, या दहा दिवसांमध्ये लोकप्रिय असलेला प्रसाद 'लाडू' ही वाटण्यात येणार असून या प्रसादासाठी लागणारे साहित्य तिरुमल्ला येथून पाठविण्यात येणार आहे. फुलांचे साहित्यही तिरुमल्ला येथूनच जाणार आहे.  
तिरुपती बालाजीची नित्य पूजाअर्चा करण्यासाठी जवळजवळ १६० पुजारी असणार आहेत. त्याचबरोबर एक दिवसआधी या पुजा-यांसह सुरक्षा रक्षक, कामगार दिल्लीत दाखल होणार आहेत. 
येत्या ३० ऑक्टोबरला तिरुपती बालाजीची प्राण प्रतिष्ठापणा करण्यात येईल, त्यानंतर पुढील दहा दिवस बालाजीची रोज सेवा आणि विशेष पुजा करण्यात येणार असल्याचे भानू प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.