आरटीओला शिवीगाळ
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
कर्मचाऱ्यांनाही दमदाटी : वाळू तस्करांची भाईिगरी
आरटीओला शिवीगाळ
कर्मचाऱ्यांनाही दमदाटी : वाळू तस्करांची भाईिगरी नागपूर : वाळू तस्करांनी आज पहाटे कारवाईसाठी सरसावलेल्या परिवहन अधिकारी (आरटीओ) तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. भंडारा मार्गावरील उमिया वसाहतीसमोर ही घटना घडली.दत्तात्रय सोपान सांगोळकर (वय ३७) हे आपल्या सहकाऱ्यांसह आज पहाटे २.३० च्या सुमारास कळमन्यात कर्तव्य बजावत होते. त्यांना एमएच ३६/ एफ १२०१ आणि एमएच ३६/ १८०१ हे ट्रक ओव्हरलोड रेती वाहून नेताना दिसले. त्यामुळे सांगोळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ट्रक रोखले. ते कारवाई करणार याची कल्पना आल्यामुळे या ट्रकचालकांच्या मदतीला एमएच ४०/केआर ८७००, एमएच ३१ /सीटी ५७११ आणि एमएच ३१/सीपी २८२८ क्रमाकांचे ट्रकचालक तसेच त्यांचे साथीदार धावून आले. १० ते १५ जणांच्या या जमावाने आरटीओ सांगोळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दमदाटी करून अश्लील शिवीगाळ केली आणि कारवाईसाठी मज्जाव केला. सांगोळकर यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे.----