ऑनलाइन लोकमतबर्लिन, दि. 24 - जर तुम्हाला आपल्या जोडीदारासोबतच्या मधुर क्षणांचा पुरेपूर आनंद अनुभवायचा असेल तर तुमच्याकडे काही महत्वची माहिती असणे आवश्यक आहे. जर्मनीच्या युनिव्हर्सिटी ऑफ बेम्बर्गनच्या संशोधकांनी शेकडो महिलांवर केलेल्या संशोधनात आढळले आहे की, एका विशिष्ट काळात प्रणय केल्याने स्त्रिया प्रणयाचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू शकतात.सेक्सॉलॉजिस्टांच्या मते, मासिक पाळी पूर्ण झाल्यावर पाच ते सात दिवसांमध्ये स्त्रियांमधील कामभावना वाढलेली असते. पाळी पूर्ण झाल्यावर स्त्रियांच्या शरीरात प्रणयाला उत्तेजना देणारे हॉर्मोन्स सक्रीय होतात. विद्यापीठाच्या संशोधकांनी तरूणींच्या मेदू लहरींवर संशोधन केले. यामध्ये असे आढळले की, मासिक पाळीनंतरच्या पाच ते सात दिवसांमध्ये प्रणय करणे अधिक आनंदाची अनुभूती देणारे ठरते.व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या सायक्रियाटिक मेडिसीन विभागाचे प्राध्यापक क्लेटन यांनी सांगितले की, मासिक पाळीनंतर स्त्रियांमध्ये प्रणयाची इच्छा तीव्र होणे स्वाभाविक आहे कारण या दिवसांमध्ये गर्भधारणेची शक्यता वाढलेली असते. या सर्वेक्षणात १००० युवती व स्त्रियांचा समावेश होता. यामध्ये प्रत्येकीने सांगितले की, मासिक पाळीनंतरच्या पाच ते सात दिवसांमध्ये त्यांना प्रणयाची तीव्र इच्छा होते. या काळात केलेल्या प्रणयाचा आनंद अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक असतो. यासोबतच सर्वेक्षणात असेही आढळले की, या काळात प्रस्थापित केलेल्या संबंधांमुळे वैवाहिक आयुष्य सुखी होऊन भविष्यात जोडीदारांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता कमी होते.
यावेळी स्त्रीया प्रणयासाठी असतात उत्सुक
By admin | Updated: April 24, 2017 20:45 IST