शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोणारा शिवारात वाघाचा धुमाकूळ

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

लोणारा शिवारात वाघाचा धुमाकूळ

लोणारा शिवारात वाघाचा धुमाकूळ
१५ शेळ्या केल्या फस्त : नागरिकांत भीतीचे वातावरण
नांद : परिसरातील लोणारा शिवारात आठवडाभरापासून वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास लोणारा येथे गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला चढवून १५ बकऱ्या फस्त केल्या. यात शेतकऱ्याचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले.
लोणारा गाव हे जंगल परिसरात वसले आहे. लोणारा गावालगत असलेल्या आलेसूर येथील माणिक मोतीराम गायकवाड या शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरून वाघाने चार शेळ्या ठार केल्या. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. त्यानंतर वाघाने लोणारा येथील शेतकरी दीपक आनंदराव ढोणे यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यातील ६० शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढविला. यात वाघाने १५ शेळ्यांना जागीच ठार केले. पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांच्या आवाजामुळे वाघ जंगलात जाताना आढळला. दरम्यान, ग्रामस्थांनी गोठ्यात पाहणी केली असता, १५ शेळ्या मृतावस्थेत आढळल्या.
या घटनेबाबत वन विभागाला सूचना देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी किरपाने व वनरक्षक प्रमोद जळीत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर मृत शेळ्यांमध्ये चार बोकडांचा समावेश आहे. या घटनेमुळे ढोणे यांचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले आहे.
अशा घटनांमुळे परिसरात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. दररोज गुराखी जनावरे चारण्यासाठी जातात. त्यांनाही वाघाच्या डरकाळ्या कानी पडत असून त्यांच्यातही भीतीचे वातावरण आहे. सध्या वाघाने जनावरांवर हल्ला करणे सुरू केले आहे. एखाद्या व्यक्तीवर वाघाने हल्ला चढविल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त लावावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)