शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

IRCTCच्या वेबसाइटवर प्रवाशांना क्रेडिटवर मिळणार तिकिट

By admin | Updated: June 24, 2017 10:00 IST

‘आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या’ अशी नवी सेवा सुरु करण्याचं रेल्वेनं ठरविलं होतं. त्यानूसार आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर तिकिट मिळणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 24-  लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासासाठी ‘आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या’ अशी नवी सेवा सुरु करण्याचं रेल्वेनं ठरविलं होतं. त्यानूसार आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर तिकिट मिळणार आहे. डिजिटल पेमेंट स्विकार करणारी ही पहिली सरकारी वेबसाइट आता पूर्णपणे कॅशलेस झाली आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला रेल्वेकडून नव्या सुविधेविषयी माहिती देण्यात आली होती. या सुविधेत प्रवासाच्या पाच दिवस आधी तिकिट बुकिंग केल्यानंतर त्या तिकिटाचे पैसे 14 दिवसानंतर देता येणार आहेत. या सेवेसाठी प्रवाशाकडून ३.५ टक्के सेवाकर घेतला जाईल. या सुविधेसाठी आयआरसीटीसीने मुंबईतील ‘ई-पेलॅटर’ या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. 
 
आयआरसीटीसीच्या या सुविधेमुळे तिकिट बुकिंगच्या वेळी तात्काळ पैसे देण्याची प्रवाशांना आता काळजी करावी लागणार नाही. आत्तापर्यंत पन्नास लोकांनी कॅशलेस तिकिट बुकिंगच्या या योजनेचा फायदा घेतला असल्याची माहिती आयआरसीटीसीचे प्रवक्ते संदिप दत्ता यांनी मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिली आहे.  जर 14 दिवसांनंतर प्रवाशांनी तिकिटाचे पैसे भरले नाहीत तर त्यांना दंड आकारला जाणार आहे. तसंच जो प्रवासी दरवेळी पैसे भरायला टाळाटाळ करेल, त्याला कायमस्वरूपी आयआरसीटीसीच्या या सेवेपासून वंचित राहावं लागणार आहे. 
 
आयआरसीटीसीवरून तिकिट बूक करणाऱ्या कोणत्या ग्राहकाला किती रूपयांपर्यतचं तिकिट क्रेडिटवर दिलं जाइल याचा निर्णय पूर्णपणे ई-पेलॅटरकडून घेतला जाणार आहे. ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री, डिजीटल फुटप्रिंट, डिवाइस इन्फॉर्मेशन आणि ऑनलाइन खरेदीच्या पॅटर्नवर इ-पेलॅटर निर्णय घेणार आहे. एखाद्या ग्राहकास क्रेडिट कार्ड देताना ‘सिबिल’कडून जशी त्याची पत पडताळणी केली जाते तीच पद्धत यासाठी अवलंबिली जाणार आहे. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पॅन कार्ड किंवा आधार क्रमांक अशी माहिती द्यावी लागणार आहे. तसंच पत पडताळणी करून ग्राहकास ही सेवा वापरण्याची मुभा मिळाली की त्याला ‘ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) पाठविला जाईल व तो वापरून त्यास पुढील व्यवहार करता येईल.