शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तापमानवाढीमुळे तळमळतोय सागराचा ‘प्राण’ !

By admin | Updated: September 13, 2014 02:16 IST

समुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे

भारत शिंदे, पणजीसमुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सखल भागामध्ये समुद्राचा विस्तार होण्याचा धोका ओळखून मानवाने वेळीच सतर्क होण्याची आवश्यकता असल्याचे असे मत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. डब्ल्यू. ए. नकवी यांनी व्यक्त केले. उल्लेखनिय म्हणजे, याच विषयावर न्यूयॉर्क येथील शिखर बैठकीत चिंतनही केले जाईल.‘हवामान बदल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम’ या संदर्भात नकवी यांनी ‘लोकमत’शी खास बातचित केली. ते म्हणाले, की समुद्राच्या पाण्यामध्ये विविध स्तर असतात. त्याचे तापमानही वेगवेगळे असते. सर्वात तळातील जलस्तराचे तापमान अत्यंत कमी म्हणजे सुमारे ३ ते ४ सेंटीग्रेड असते. त्याची घनताही जास्त असते. समुद्राच्या बहुतांश पाण्याची घनता सरासरी १.०३ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर असते. त्याचबरोबर समुद्रातील ७५ टक्के पाण्याचे तापमान ० ते ६ डिग्री सेंटीग्रेड असते. खोल समुद्रातील पाण्याचा स्तर आणि ध्रुवीय प्रदेशातील पाणी थंड असते. त्याच्यावर वातावरणातील तापमान बदलाचाही परिणाम होतो.वाढत्या तापमानाचा माशांच्या खाद्यावर, गरम पाण्यामध्ये शेवाळावर तसेच माशांच्या शारीरिक संरचनेवर व प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.जागतिक स्तरावर विचार केल्यास न्युझीलंडमध्ये समुद्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. हे जर असेच होत राहिले तर न्युझीलंड जगाच्या नकाशावर राहील काय, हा प्रश्न आहे. तेथे जमिनीच्या दरातही कमालीची घसरण झाली आहे. त्या तुलनेत नेदरलँडमध्ये समुद्राचे तापमान स्थिर आहे, असेही नकवी यांनी सांगितले.गोव्यामध्ये करंझाळेसारख्या सखल भागात समुद्राच्या वाढत्या पाण्याचा विस्तार होत आहे. गेल्या महिन्यात मुंबईच्या किनाऱ्यावरील उंच उंच लाटांनी काही परिसर जलमय झाला होता. बांगलादेशास पुराचा तडाखा बसला तर तेथील लोक जीव वाचविण्यासाठी शेजारील भागात म्हणजे भारताच्या सीमावर्ती राज्यात स्थलांतर करतात. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत, याचाही उल्लेख नकवी यांनी केला. सध्या समुद्राचा विस्तार रोखण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान विकसित झालेले नाही.