शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसमध्ये छेडछाड करून मायलेकीला फेकले

By admin | Updated: May 1, 2015 02:41 IST

पंजाबमध्ये बुधवारी सायंकाळी मायलेकीला धावत्या बसमध्ये छेडछाड करून नंतर खाली ढकलून देण्यात आल्याची संतप्त घटना घडली.

पंजाबमधील अमानवीय घटना : मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमीमोगा(पंजाब)/नवी दिल्ली: दिल्लीतील निर्भया हत्याकांडाच्या कटुस्मृती अजूनही कायम असताना पंजाबमध्ये बुधवारी सायंकाळी मायलेकीला धावत्या बसमध्ये छेडछाड करून नंतर खाली ढकलून देण्यात आल्याची संतप्त घटना घडली. यात पीडित तरुणीला आपला जीव गमवावा लागला तर तिची आई जबर जखमी झाली. मोगापासून १० किमी अंतरावर गिल गावाजवळ झालेल्या या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेसह संपूर्ण देशात उमटले. सदर बस पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीची असून विरोधकांनी बादल कुटुंबीयांवर हल्लाबोल केला असून काँग्रेसने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी बसचा कंडक्टर सुखरिंदर आणि क्लीनर गुरदीपला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. बस चालकाविरुद्ध मात्र तक्रार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून कंडक्टर व क्लीनरविरुद्ध भादंविच्या ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३५४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला) आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मोगाचे पोलीस अधीक्षक (हेरगिरी) एच. एस. पन्नू यांनी गुरुवारी या घटनेची माहिती दिली. बसमधून प्रवास करीत असताना कंडक्टर, क्लीनर आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीने आपल्या १६ वर्षीय मुलीची छेड काढून त्रास देणे सुरू केले आणि नंतर धक्का देऊन खाली फेकले, अशी तक्रार मृत तरुणीच्या आईने केली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी छेडछाड करणाऱ्यांपासून स्वत:चा बचाव करण्याकरिता दोघींनी बसमधून स्वत:हून उडी घेतल्याचा दावा केला होता. (वृत्तसंस्था)काय घडले३८ वर्षीय महिला आणि तिची मुलगी बुधवारी सायंकाळी बसने मोगा येथून बागापुरानाला जात होत्या. यावेळी बस जवळपास रिकामी होती. प्रथम बसच्या क्लीनरने महिलेसोबत छेडछाड सुरू केली. तिने विरोध केल्यानंतरही ते थांबले नाहीत. दरम्यान, आणखी काही आरोपी बसमध्ये चढले आणि सर्वांनी मिळून महिला व तिच्या मुलीला त्रास देणे सुरू केले. महिलेचा १० वर्षांचा मुलगाही त्यांच्यासमवेत होता. विरोधानंतर दोघींनाही धावत्या बसमधून खाली ढकलण्यात आले.ही घटना म्हणजे मानवतेला कलंक आहे. मी याची तीव्र शब्दात निंदा करतो. - प्रकाशसिंग बादलमुख्यमंत्री, पंजाब‘संपूर्ण पंजाबमध्ये बादल कुटुंबाच्या इशाऱ्याने दहशत पसरविली जात आहे. गुन्हा केल्यानंतर बसच्या चालकदलाचे कर्मचारी बसखाली कुणी चिरडले आहे बघून घ्या, असे पोलिसांना सांगतात. बस थांबविण्याचीही गरज त्यांना वाटत नाही, एवढे ते निर्ढावले आहेत.’- भगवंत मानआपचे खासदार, पंजाब