शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

तीन बहिणींवर अ‍ॅसिड फेकून तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: September 6, 2016 04:15 IST

तीन बहिणींवर अ‍ॅसिड फेकून तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात सोमवारी घडली.

अहमदाबाद : तीन बहिणींवर अ‍ॅसिड फेकून तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात सोमवारी घडली. या तिघींपैकी दोघी अल्पवयीन आहेत. पोलीस एकतर्फी प्रेमासह विविध कोनातून या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. तळजा शहरातील रहिवासी सुनील सरवय्या (२०) याने २१, १७ आणि १६ वर्षे वयाच्या तिघींवर कथितरीत्या अ‍ॅसिड फेकले. या मुलींवर भावनगर येथील सर टी हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत. या तिघी तळोजा शहरातील बाजारपेठेतून जात असताना सुनीलने त्यांना गाठले आणि त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकले. तिघींनाही फारशी दुखापत झाली नाही. केवळ हाताला थोडेसे भाजले. अ‍ॅसिड फेकल्यानंतर सरवय्या याने जवळच्या तळ्यात उडी मारून आत्महत्या केली, असे पोलीस उपनिरीक्षक पी. एस. रिझवी यांनी सांगितले. सरवय्या शहरातील मोबाईल दुरुस्तीच्या एका दुकानात कामाला होता, असे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले. सरवय्यासोबत आणखी एक युवक होता, असा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केला असून, पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. सरवय्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याने हे पाऊल का उचलले याचे कारण लगेचच समजू शकले नाही. एकतर्फी प्रेमासह विविध बाजू आम्ही तपात आहोत. गुन्ह्याच्या वेळी सरवय्यासोबत आणखी कोणी होते काय, याचीही आम्ही चौकशी करीत आहोत, असे रिझवी म्हणाले. (वृत्तसंस्था)