शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांनंतरही मोदींचे गारुड कायम

By admin | Updated: May 26, 2017 03:14 IST

मोदी सरकारच्या कामगिरीचे ‘लोकमत’च्या लाखो वाचकांनी केलेले मूल्यमापन...

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसभेत संपूर्ण बहुमत लाभलेल्या कोणत्याही सरकारसाठी पहिले तीन वर्ष तसे आव्हानात्मक, आश्वासक आणि दिशादर्शक असतात. या तीन कसोट्यांवर मोदी सरकारच्या कामगिरीचे लोकमतच्या लाखो वाचकांनी केलेले मूल्यमापन लक्षात घेतले, तर जनतेच्या मनावर आजही मोदींचे गारूड कायम असल्याचे दिसून येते. नोटाबंदीच्या निर्णयावर कितीही टीका झाली असली तरी, लोकांनी याच निर्णयावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. विकासाचा अजेंडा, गतिमान प्रशासन, भ्रष्टाचारावर अंकुश या मुद्यांवर सरकाराची कामगिरी उत्कृष्ट श्रेणीत असली तरी बेरोजगारी, महिलांना सुरक्षा, दारिद्रयनिर्मुलन आदी विषयांवर अजून बरेच काम बाकी आहे.शिवाय, मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी वगळता इतर मंत्र्यांची कामगिरी तितकी सरस असल्याचे दिसून येत नाही. संरक्षणासारखे महत्वाचे खाते, मंत्र्याविना ठेवणे देशाच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने चांगले नाही. सध्या या खात्याचा अतिरिक्त पदभार अर्थमंत्री अरुण जेटली सांभाळत आहेत.काश्मीरच्या प्रश्नावरही आणखी कठोर भूमिका हवी, अशी अपेक्षा वाचकांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकार आल्यापासून जातीयवादी शक्तिंना खतपाणी मिळत असल्याची भावना वाढीस लागली आहे. असहिष्णुतेच्या नावाने उठलेले वादळ शमले असले तरी दादरी, सहारणपूरसारख्या घटनांची पुनर्रावृत्ती होत राहिली तर या सरकारच्या प्रतिमेवर तो कलंक असेल.  राष्ट्रवादाच्या उन्मादातून सामाजिक हिंसा घडवून आणणाऱ्या शक्तींना वेळीच आवर घातला गेला नाही, तर विकासाच्या अजेंड्यांवर पाणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘अच्छे दिना’चे स्वप्न अजून प्रत्यक्षात साकारले गेले नसले, तरी सरकारची वाटचाल आश्वासक असल्याचा निष्कर्ष या सर्व्हेतून समोर येतो.

1)मोदी सरकारकडून तीन वर्षांमध्ये तुमच्या अपेक्षांची पूर्तता होतेय का?

2)पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार संपेल, असे म्हटले होते. भ्रष्टाचार थांबला आहे का?

3)मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात विकास झाला, असे वाटते का ?

 

4) सरकारने घेतलेल्या या निर्णयांपैकी तुम्हाला आवडलेला निर्णय कोणता?

5) मोदी सरकारच्या काळात देशातील गरिबी कमी झाल्याचे तुम्हाला वाटते का?

6) मोदी सरकार आल्यापासून महागाई वाढली की कमी झाली?

7)मोदी सरकारच्या काळात शासन दरबारी जलद गतीने कामं होतात का?

8) तीन वर्षांच्या काळात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या का?

9)मोदी सरकार निर्णय घेताना यापैकी कोणाचा अधिक विचार करते असे वाटते?

10)मोदी सरकार आल्यापासून महिलांना सुरक्षेची हमी मिळाली का?

11)मोदी सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांत देशात असहिष्णुता वाढली आहे का?

12)या सरकारमुळे जातीयवादी शक्तींना बळ मिळतंय, असे वाटते का?

13)दहशतवाद, नक्षलवाद याविषयी मोदी सरकारची भूमिका कशी वाटते?

14)मोदी सरकार काश्मीर प्रश्न कसा हाताळत आहे?

15)मोदी सरकारचे पाकिस्तानसंबंधीचे धोरण कसे आहे?

16) मोदी सरकारमधील मंत्री त्यांच्याकडील खात्यास न्याय देत आहेत का?

17)मोदी यांच्या मंत्रिमंडळात सर्वोत्तम मंत्री कोण?

18) तुमच्या मनात पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा कशी आहे?

19) पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची तीन वर्षांची कारकीर्द कशी वाटते?

20) लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजपाला किती जागा मिळतील?

21) मोदी यांचा करिष्मा तीन वर्षांनंतरही कायम आहे असे वाटते का?

 

ग्राफिक्स : प्रदीप सूर्यवंशी, अमित भेरेरेखाचित्र : अमोल ठाकूर