शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्त्या

By admin | Updated: July 3, 2015 23:17 IST

नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा, सातपूर परिसरात दोघांनी गळफास घेत तर आनंदवली येथील महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ पहिली घटना पाथर्डी फाट्यावरील दामोदरनगरच्या श्री आर्केड अपार्टमेंटमध्ये घडली़ या अपार्टमेंटमध्ये राहणारे योगेश यशवंत ठाकरे (वय ४०) यांनी गुरुवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा, सातपूर परिसरात दोघांनी गळफास घेत तर आनंदवली येथील महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ पहिली घटना पाथर्डी फाट्यावरील दामोदरनगरच्या श्री आर्केड अपार्टमेंटमध्ये घडली़ या अपार्टमेंटमध्ये राहणारे योगेश यशवंत ठाकरे (वय ४०) यांनी गुरुवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़दुसरी घटना सातपूर गावात घडली आहे़ योगेश बाबूराव जगताप (वय ३०) या युवकाने शुक्रवारी (दि़३) सकाळच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ या युवकाच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़तिसरी घटना आनंदवल्ली परिसरात घडली असून येथील एका महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली आहे़ या महिलेचे नाव कमलाबाई गोरख पवार (वय ४०) असे असून त्या आनंदवली पोलीस चौकीजवळ राहत होत्या़ कमलाबाई पवार यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)