शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

तीन राज्यांत मुसळधार : आसामात दरडी कोसळून १० ठार

By admin | Updated: May 19, 2016 04:26 IST

उष्मालाटेने देश होरपळून निघाला असताना, किमान तीन राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत अन्य भागाच्या आशा पल्लवित केल्या आहे.

गुवाहाटी/ चेन्नई/ भुवनेश्वर : उष्मालाटेने देश होरपळून निघाला असताना, किमान तीन राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत अन्य भागाच्या आशा पल्लवित केल्या आहे. हवामान विभागाने येत्या ४८ तासांत आणखी एक-दोन राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.आसामच्या बराक खोऱ्यातील करीमगंज आणि हैलाकांडी जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळून १० जण ठार झाले. अरुणाचलमध्ये गेल्या काही दिवसांपासूनच्या जोरदार पावसामुळे नोआ-देहलिंग नदीला पूर आल्यामुळे हाहाकार उडाला. हवामान विभागाने तामिळनाडू आणि ओडिशा, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात पश्चिम-मध्य भागात केंद्रित झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या काही भागांमध्ये बुधवारी तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यता असून, उत्तर किनारपट्टीसह पुद्दुचेरीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>ओडिशामध्ये चक्रीवादळाबाबत सतर्कता...ओडिशाच्या गोपालपूरपासून आग्नेयेकडे ७८० किमी. अंतरावर बंगालच्या उपसागरालगत कमी दाबाचा पट्टा केंद्रित झाला असून, हवामान विभागाने प्रथमच चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून उत्तर आणि ईशान्येकडे सरकत जाणार असून, २४ तासांत वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल. पुढील ४८ तासांत ते उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडे सरकलेले असेल. चेन्नईत एनडीआरएफच्या चार चमू ... तामिळनाडूत चेन्नईच्या पश्चिमेकडे ९० किमी, तर पूर्वेकडे ७० किमी. अंतरावर कमी दाबाचा पट्टा सरकलेला राहील. त्याची परिणती तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि लगतच्या पुद्दुचेरीमध्ये येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्यात होऊ शकते. चेन्नईच्या सखल भागात एनडीआरएफचे चार चमू दाखल झाले आहेत.अरुणाचलमध्ये तीन गावे पुराखाली... गेल्या काही दिवसांपासून अरुणाचलमध्ये संततधार पावसामुळे नोआ-देहलिंग नदीला पूर आला असून, नामसाई जिल्ह्यांतील महादेवपूर-१, महादेवपूर-४ आणि काकोनी ही गावे पाण्याखाली आली आहेत. धानाची पिकेही बुडाली आहेत. १० मे रोजी बाबूंची पाच घरे वाहून गेली होती. आंध्र किनाऱ्यावर चक्रीवादळाची शक्यता आंध्र प्रदेशच्या दक्षिण आणि उत्तर भागांतील किनाऱ्यांवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली असून, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सर्व ठिकाणी होईल, हे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे, असे सांगून नायडू म्हणाले की, ‘परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार जिल्हा प्रशासनांना सूचना आणि मदत देण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.’