शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहीत 3 जण NIAच्या ताब्यात

By admin | Updated: June 28, 2017 10:48 IST

काश्मीरमधील कट्टर फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयासहीत तीन जणांना राष्ट्रीय तपास संस्थेनं बुधवारी (28 जून) ताब्यात घेतले आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 28 - काश्मीरमधील कट्टर फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयासहीत तीन जणांना राष्ट्रीय तपास संस्थेनं बुधवारी (28 जून) ताब्यात घेतले आहे. अयाज अकबर, अलताफ शाह आणि मेहराज उद्दीन कलवल या तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेनं ताब्यात  घेतले आहे.
 
हे तिघंही हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते आहेत. अलताफ शाह हा गिलानी यांचा जावई आहे.  काही दिवसांपूर्वी "एनआयए"नं या सर्व हुर्रियत नेत्यांच्या घरावर छापा मारला होता. या तिघांनाही बुधवारी (28 जून) नवी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी पाकिस्तानकडून मिळणा-या आर्थिक मदतीसंबंधी "एनआयए"नं तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. 
 
राष्ट्रीय तपास संस्था जम्मू काश्मीरमधील हिंसक कारवायांमध्ये लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि कट्टर फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या भूमिकांबाबत तपासणी करत आहे. NIA काश्मिरी फुटीरतावादी नेता नईम खानविरोधातही दहशतवादी संघटनांकडून पैसे घेण्यासंबंधी तपास करत आहे. एक खासगी वृत्तवाहिनीनं दाखवलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नईम खान दहशतवादी संघटनांकडून पैसे घेत असल्याची बाब स्वीकारत असल्याचे दाखवण्यात आले होते. 
 
जम्मू काश्मीरमध्ये जुलै 2016मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्मीर खो-यातील हिंसाचारात प्रचंड वाढ झाली आहे. वर्षभरात काश्मीर खो-यात झालेल्या हिंसक घटनांमध्ये जवळपास 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. शिवाय, दगडफेकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दगडफेकीत शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही समावेश आहे. गिलानींसहीत अन्य फुटीरतावादी नेत्यांवर आरोप आहेत की, ते पाकिस्तान आणि अन्य दहशतवादी संघटनांकडून आर्थिक रसद घेऊन काश्मीर खो-यात अशांतता पसरवण्यास मदत करत आहेत. मात्र फुटीरतावादी नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.