गिरणा धरणात तीन टक्के पाणीसाठा छोट्या धरणाच्या साठ्यात वाढ : अंजनी,बहुळा व मन्याडला पावसाची प्रतिक्षा
By admin | Updated: July 19, 2016 23:41 IST
जळगाव : गिरणा नदीच्या धरण क्षेत्रात काही दिवसापासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे गिरणा धरणात ३.९ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील छोट्या धरणांमध्ये पाणासाठ्यात वाढ होत असताना अंजनी, बहुळा, मन्याडसह सहा धरण क्षेत्रात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे.
गिरणा धरणात तीन टक्के पाणीसाठा छोट्या धरणाच्या साठ्यात वाढ : अंजनी,बहुळा व मन्याडला पावसाची प्रतिक्षा
जळगाव : गिरणा नदीच्या धरण क्षेत्रात काही दिवसापासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे गिरणा धरणात ३.९ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील छोट्या धरणांमध्ये पाणासाठ्यात वाढ होत असताना अंजनी, बहुळा, मन्याडसह सहा धरण क्षेत्रात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे.गिरणा धरण क्षेत्रात दमदार पाऊसगेल्या काही दिवसांपासून गिरणा धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, हरणबारी, नागासाक्या या धरणांमधील जलसाठा चांगला झाला आहे. त्यामुळे गिरणा धरणात ३.०९ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या या धरणात १६.१७ दलघमी पाणीसाठा आहे. तर ३८२.७८ मीटर पाणीपातळी आहे. यासोबत हतनूर धरणात १७.९६ टक्के जलसाठा आहे. तर वाघूर धरणात ५०.८८ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील या मोठ्या प्रकल्पांमध्ये १८.३५ टक्के पाणीसाठा आहे.छोट्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठामोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असताना काही छोट्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. त्यात अभोरा धरणात ५४.९३, मंगरुळ ९६.१८, सुकी ८८.४१, मोर ४८.१३, तोंडापूर ३८.४८, गुळ २६.१० टक्के जलसाठा आहे. मात्र अजूनही अग्नावती, हिवरा, बहुळा, अंजनी, भोकरबारी, मन्याड व बोरी या धरणांमध्ये ठणठणाट असल्याने पावसाची प्रतिक्षा आहे.वाघूर धरण क्षेत्रात ४० मि.मी. पाऊसगेल्या २४ तासात गिरणा धरण वगळता छोट्या व मोठ्या बहुतांश धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यात हतनूर धरण क्षेत्रात १४ मिमी, वाघूर ४०, हिवरा ४०, अग्नावती १५, बहुळा २४, अंजनी १८ मिमी पाऊस झालेला आहे. त्यापाठोपाठ अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, भोकरबारी, तोंडापूर या धरणक्षेत्रात पाऊस झाला आहे. सध्या हतनूर धरणाचे ४ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. तर दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे.