तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST
तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखलनागपूर : प्लॉट खरेदी केल्याची रक्कम चेकद्वारे दिल्यानंतर बँकेत चेक बाऊन्स झाल्यामुळे प्लॉट खरेदी करणाऱ्या आरोपींविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजीत शशिकांत शेंडे (५०) रा. १०१, राजेश्वरी एन्क्लेव्ह साईट क्रॉस मारोती लेआऊट, बेंगळुरू यांचा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंटिफिक सोसायटी येथे ८ हजार चौरस फुटांचा प्लॉट आहे. या प्लॉटचा सौदा आरोपी अभय मुकुंद भारती (४०) रा. रामनगर नागपूर, शशांक गोविंदप्रसाद पांडे (४९) रा. ब्रह्मकुंज प्लॉट नं. ५३९ रामदासपेेठ, शशिकांत नारायण पुरी (६२) रा. गणेश अपार्टमेंट, कोतवालनगर यांनी ३.८४ कोटी रुपयात केला. आरोपींनी संजित शेंडे यांना १ कोटी रुपये रोख दिले; उर्वरित २ कोटी २० लाखाची रक्कम त्यांनी चेकद्वारे दिली. बँकेत चेक बाऊन्स झाल्यामुळे शेंडे यांना प्लॉटची रक्कम मिळाली नाही. यावरून त्यांनी प्रतापनगर पोलिसात तक्रार दाखल केली. प्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.