शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली हल्ल्यात तीन जवान शहीद

By admin | Updated: August 27, 2015 04:31 IST

ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी बुधवारी पाळत ठेवून निमलष्करी दलाच्या गस्ती पथकावर हल्ला केला. यात सीमा सुरक्षा दलाचे

मलकानगिरी : ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी बुधवारी पाळत ठेवून निमलष्करी दलाच्या गस्ती पथकावर हल्ला केला. यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) तीन जवान शहीद झाले, तसेच एक नागरिकही ठार झाला असून अन्य सहाजण जखमी झाले आहेत. बीएसएफच्या १०४ तुकडीतील गस्तीपथक सकाळी ७.३० वाजता जनबाई छावणीजवळ असताना नक्षलवाद्यांनी प्रथम भूसुरुंग स्फोट घडविला आणि नंतर पथकावर तुफान गोळीबारही केला. या हल्ल्यात एक सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल शहीद झाले, तर कंपनीचे कमांडर सहायक कमांडंट अशोककुमार यांच्यासह सहाजण जखमी झाले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बीएसएफला नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत या भागात तैनात करण्यात आले असून मंगळवारी रात्री गस्तीवर निघालेले हे पथक मोहिमेवर असतानाच हा हल्ला झाला.चित्रकोंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पिताबस धरुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार जवानांचे पथक नावेतून चित्रकोंडा तलाव पार करून चिंतमदोली घाटावर पोहोचल्यानंतर हल्ला झाला. जवानांनीही प्रत्युत्तरात कारवाई केली. दरम्यान, जखमींपैकी तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मलकानगिरी नक्षल हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. (वृत्तसंस्था)