शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

तीन भारतीय युएईतून हद्दपार

By admin | Updated: January 30, 2016 00:07 IST

इसिस या दहशतवादी संघटनेबाबत सहानुभूती बाळगणाऱ्या तीन भारतीय युवकांना संयुक्त अरब अमिरातमधून (युएई) भारतात हद्दपार करण्यात आले आहे. हे तिघेही भारतात आणि काही

नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेबाबत सहानुभूती बाळगणाऱ्या तीन भारतीय युवकांना संयुक्त अरब अमिरातमधून (युएई) भारतात हद्दपार करण्यात आले आहे. हे तिघेही भारतात आणि काही अन्य देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्याच्या मोहिमेवर असल्याचा आरोप आहे.अदनान हुसैन, मोहम्मद फरहान आणि शेख अजहर अल इस्लाम अशी या भारतीयांची नावे आहेत. या तिघांनाही युएईतून हद्दपार करून भारतात पाठविण्यात आले. गुरुवारी रात्री ते नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांना ताब्यात घेतले. ते महाराष्ट्र, कर्नाटक व जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत.माहितीनुसार, हे तिघेही आपल्या अन्य अज्ञात सहकाऱ्यांसमवेत भारत व अन्य मित्र राष्ट्रांमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी भारत आणि अन्य देशांमधील भारतीय नागरिकांची भरती आणि प्रशिक्षण देण्याचे काम करीत होते. हे तिघेही इसिसच्या अबूधाबी गटाचे सदस्य असल्याचा संशय आहे. एनआयए या तिघांचीही चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करेल आणि त्यानंतर त्यांना लवकरच अटक होईल.याआधी युएईने १५ सप्टेंबर २०१५ रोजी इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून चार भारतीयांना हद्दपार केले होते. त्यानंतर युवकांना इसिसकडे आकर्षित करण्याचे काम केल्याच्या आरोपावरून ३७ वर्षीय आफसा ऊर्फ निक्की जोसेफ या महिलेलाही हद्दपार करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)मुख्तार अब्बास नक्वींनाही धमकीकेंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनाही इसिसकडून धमकी देणारे पत्र मिळाले आहे. याबाबत दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. नकवी यांच्यानिवासस्थानी २५ जानेवारी रोजी धमकी पत्र प्राप्त झाले. उर्दू व इंग्रजीत लिहिलेले हे पत्र पोस्टाने आले आणि त्यात अर्वाच्च शब्द वापरले गेले.