शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे खासदार पहिल्याच वेळी आले निवडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:17 IST

अनेकांचा व्यवसाय समाजसेवा, शेती

एस. के. गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सतराव्या लोकसभेत ३०० खासदार पहिल्याच वेळी निवडून आले आहेत. यापैकी बव्हंशी खासदारांचा व्यवसाय समाजसेवा आणि शेती आहे. तीन टक्के कलाकार आणि सर्वांत कमी २ टक्के शिक्षक संसदेत पोहोचले आहेत. लोकसभेच्या ७८ जागांवर महिला आणि ४६४ जागांवर पुरुष विजयी झाले आहेत.

सतराव्या लोकसभेवर निवडून आलेल्या ३९४ खासदारांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले आहे.पहिल्या लोकसभेत महिला खासदारांचे प्रमाण ५ टक्के होते; ते या वेळी १४ टक्के झाले आहे. तथापि, अन्य देशांच्या तुलनेत भारताच्या संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व अजूनही कमीच आहे. अन्य देशांतील संसदेतील महिलांचे प्रतिनिधित्व बघता रवांडामध्ये ६१ टक्के, दक्षिण आफ्रिकेत ४३ टक्के, ब्रिटनमध्ये ३२ टक्के, अमेरिकेत २४, तर बांगलादेशात २१ टक्के आहे. सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण ७१६ महिला उमेदवार रिंगणात होत्या. यापैकी ७८ महिला लोकसभेवर निवडून आल्या आहेत. सोळाव्या लोकसभेत ६२ महिला खासदार होत्या.या वेळी लोकसभेवर निवडून आलेल्या पुरुष खासदारांचे वय महिला खासदारांच्या तुलनेत ६ वर्षे अधिक आहे. पुरुष खासदारांचे सरासरी वय ५४ वर्षे, तर महिला खासदारांचे वय सरासरी ४८ वर्षे आहे. नव्या लोकसभेत ४२ टक्के खासदारांचे वयोमान ५६ ते ७० वर्षांदरम्यान आहे, तर ४१ टक्के खासदारांचे वय ४१ ते ५५ वर्षांदरम्यान आहे. बारा टक्के खासदारांचे वय २५ ते ४० वर्षांदरम्यान आहे. सत्तरपेक्षा अधिक वयाचे ६ टक्के खासदारआहेत.

शिक्षण बारावी ते पीएच.डी.सतराव्या लोकसभेते ४३ टक्के खासदार पदवीधर, २७ टक्के बारावी उत्तीर्ण, २५ टक्के पदव्युत्तर असून ४ टक्के खासदार पीएच.डी. झालेले आहेत.

397 खासदार राष्ट्रीय पक्षांचे...या वेळी निवडून आलेल्या खासदारांपैकी ३९७ खासदार राष्ट्रीय पक्षांचे आहेत. यापैकी भाजपचे ३०३, काँग्रेसचे ५२ आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे २२ खासदार निवडून आले आहेत. या वेळी १९७ खासदार दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. मागच्या लोकसभेत १६९ खासदार दुसऱ्यांदा निवडून आलेले होते.पीआरएस इंडियाच्या संकलित माहितीनुसार अनेक खासदारांनी एकापेक्षा अधिक व्यवसाय असल्याचे सांगितले. ३८ टक्के खासदारांनी आपला व्यवसाय राजकारण आणि समाजसेवा असल्याचे घोषित केलेले आहे.

39% खासदार शेती करतात, तर २३ टक्के खासदार व्यवसाय करतात. फक्त ४ टक्के खासदार व्यवसायाने वकीलआहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९