शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तीन सहका-यांची जवानाकडून हत्या

By admin | Updated: October 9, 2014 03:18 IST

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) हेड कॉन्स्टेबलने निमलष्करी दलाच्या शिबिरात आपल्या तीन सहकाऱ्यांची गोळी झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना

कांचीपुरम : येथे स्थित असलेल्या कलपक्कम अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) हेड कॉन्स्टेबलने निमलष्करी दलाच्या शिबिरात आपल्या तीन सहकाऱ्यांची गोळी झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. या हल्ल्यात अन्य दोन जण जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी हेड कॉन्स्टेबल विजय प्रताप सिंह (४५) याने अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या सीआयएसएफच्या शिबिरात नऊ एमएमच्या कार्बाईनने गोळ्या झाडून सहायक उपनिरीक्षक गणेशन व हेड कॉन्स्टेबल सुब्बुराज आणि मोहनसिंग यांची हत्या केली. या घटनेमुळे अणुऊर्जा प्रकल्प परिसरातील कामकाजावर कुठलाही विपरीत परिणाम झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.कलपक्कम शहरात असलेल्या सीआयएसएफच्या शिबिरात सकाळच्या कामकाजाची सुरुवात होत असतानाच ही घटना घडली. सकाळी जवानांना त्यांची शस्त्रे दिल्यानंतर लगेचच त्याने हा हल्ला केला. त्यामागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत, असे पोलीस अधीक्षक सी. विजयकुमार यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात जखमी झालेले सहायक उपनिरीक्षक प्रताप सिंग व हेड कॉन्स्टेबल गोवर्धन सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्ली मुख्यालयातील प्रवक्ते हेमेंद्र सिंग यांनी, सिंग हा बराच अनुभवी जवान असून तो १९९० साली या दलात दाखल झाल्याचे सांगितले. हेड कॉन्स्टेबलची बढती मिळाल्यानंतर तो या अणुऊर्जा प्रकल्पात आला होता. (वृत्तसंस्था)