शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

रायपूर हॉस्पिटलमध्ये तीन मुलांचा मृत्यू;ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 13:17 IST

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची गोरखपूरमधील घटना ताजी असतानाच तशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे

ठळक मुद्दे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची गोरखपूरमधील घटना ताजी असतानाच तशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे रायपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हॉस्पिटलमधील स्पेशल केअर युनिटमध्ये ऑक्सिजनचा दबाव कमी झाल्याने या तीन मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो आहे.

रायपूर, दि. 21- ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची गोरखपूरमधील घटना ताजी असतानाच तशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. रायपूरमधील भीमराव आंबेडकर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हॉस्पिटलमधील स्पेशल केअर युनिटमध्ये ऑक्सिजनचा दबाव कमी झाल्याने या तीन मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी दिले आहेत

आरोग्य सेवेचे संचालक आर प्रसन्न यांच्या माहितीनुसार, जेव्हा ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाला तेव्हा लगेचच ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांना अलार्म दिला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. रविवारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याचा फोन आला होता. त्या फोननंतर सीएमओ आणि अधिक्षकांना तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करत उपाय केले. असं प्रसन्न यांनी सांगितलं आहे. 

बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा असून यासाठी एक ऑपरेटर नेमण्यात आला आहे. मात्र रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील ऑपरेटर झोपला आणि त्याचा हा निष्काळजीपणा तीन बालकांच्या जिवावर बेतल्याची प्रतिक्रिया उमटते आहे.‘ऑपरेटरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत’ अशी प्रतिक्रिया  मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सोमवारी सकाळी दिली. हॉस्पिटसमध्ये प्राणवायूचा तुटवडा नव्हता, ऑपरेटरमुळे ही घटना घडली असं हॉस्पिटल प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : मृतांची संख्या १0५ वर गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृतांची संख्या १0५ वर गेली असली तरी उत्तर प्रदेश सरकार त्याकडे फारशा गंभीरपणे पाहताना दिसत नसल्याचे जाणवत आहे. गुरुवार व शुक्रवारी १0 जणांचे मृत्यू झाल्याने हॉस्पिटल प्रशासनानेही मान्य केले. ऑगस्टरच्या दुसऱ्या आठवड्यात ३0 बालकांचा मृत्यू झाल्यावर असं घडलं नाही, असं सरकार सांगत होतं. नंतर आकडा ७ आहे, अस मान्य केलं. नंतर संख्या ६३ वरून वाढत गेली आणि आता ती १0५ झाली.हॉस्पिटलमधील बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू झाले असून, विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, हे आधीच्या सरकारचे पाप आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी अखिलेश यादव सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. समाजवादी पक्षाने मात्र नव्या सरकारच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा हा नमुना असल्याचा आरोप केला आहे.