शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्तींना जिवे मारण्याची धमकी

By admin | Updated: August 8, 2015 09:18 IST

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनची अखेरची याचिका फेटाळणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पीठातील न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे

नवी दिल्ली : मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनची अखेरची याचिका फेटाळणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पीठातील न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीची गांभीर्याने दखल घेत त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.तुघलक रोडवरील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मागच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी धमकीचे हे पत्र मिळाले. न्या. मिश्रा यांना मिळालेले धमकीपत्र गंभीर असून हे बेनामी पत्र पाठवून कुणीतरी खोडसाळपणा केला असावा ही शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे.

न्यायमूर्तींचे खासगी सुरक्षा अधिकारी तपास करीत असताना त्यांना हे पत्र मिळाले. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली. विशेष आयुक्त (कायदा व्यवस्था) लगेच न्यायाधीशांच्या निवासस्थानी गेले आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. न्यायमूर्तींच्या निवासस्थानाभोवतीचे सुरक्षा कवच वाढविण्यासोबतच संपूर्ण नवी दिल्ली क्षेत्रात दहशतवाद प्रतिबंधक सुरक्षा कवायत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याकूब मेमनला गेल्या ३० जुलैला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आल्यानंतर लगेच न्या.मिश्रा आणि त्यांच्या दोन सहकारी न्यायाधीशांची सुरक्षा वाढविण्यात आली होती. तीन न्यायाधीशांनी मेमनने अंतिम क्षणी केलेली याचिका फेटाळली होती.धमकीचे पत्र पाठविणाऱ्यांनी न्या.मिश्रा यांच्या घराची ‘रेकी’ केली असावी असा अंदाज आहे. निवासस्थानाबाहेर सुरक्षारक्षक तैनात असून त्यांच्या कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे हे संशयितांना माहिती होते.

एवढेच नाही तर मिश्रा यांच्या घरामागील प्रवेशद्वाराजवळ घनदाट वृक्ष असल्याने येथे पत्र ठेवल्यास सीसीटीव्हीत छायाचित्र टिपले जाणार नाही याचीही त्यांना पुरेपूर कल्पना होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.दिल्ली पोलिसांशिवाय केंद्रीय निमलष्करी दलाचे जवानही न्या.मिश्रा यांच्या निवासस्थानावरील बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)