सागर चौधरीच्या भावाकडून धमकी
By admin | Updated: November 27, 2015 21:32 IST
जळगाव: सागरला आता जामीन झाला आहे, त्याच्या यादीत तू पहिला आहे व तो आजच कार्यक्रम दाखवेल अशा शब्दात वाळूमाफिया सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (वय ३५ रा.चौघुले प्लॉट) याने देवेंद्र लक्ष्मण आखाडे (वय ३९) यांना शुक्रवारी संध्याकाळी धमकी दिली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली आहे.
सागर चौधरीच्या भावाकडून धमकी
जळगाव: सागरला आता जामीन झाला आहे, त्याच्या यादीत तू पहिला आहे व तो आजच कार्यक्रम दाखवेल अशा शब्दात वाळूमाफिया सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (वय ३५ रा.चौघुले प्लॉट) याने देवेंद्र लक्ष्मण आखाडे (वय ३९) यांना शुक्रवारी संध्याकाळी धमकी दिली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली आहे.देवेंद्र आखाडे एस.टी.त कर्मचारी आहेत. ते व किशोर चौधरी दोघंही शेजारीच राहतात. चौघुले प्लॉट चौकात सागरचे काका मोहन चौधरी यांची पानटपरी आहे. शुक्रवारी संध्याकाळी आखाडे हे या पानटपरीवर बसलेले असताना किशोर तेथे आला व त्याच्या काकाला म्हणाला की, तू याला टपरीवर का बसू देतो, सागरचा आता जामीन झाला आहे. त्याच्या यादीत आखाडेचा पहिला नंबर आहे. तो आजच याचा कार्यक्रम दाखवेल असे म्हणत धमकी दिली. या प्रकारानंतर आखाडे यांनी पत्नीला सोबत घेऊन थेट शनी पेठ पोलीस स्टेशन गाठले. तेथे त्याच्या मागे किशोर हादेखील पत्नीसह दाखल झाला. आखाडे यांच्या फिर्यादीवरून किशारे चौधरीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर याच्याकडून आपणास व कुटुंबाला धोका असल्याचे आखाडे यांनी म्हटले आहे.