शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयावर बॉम्बहल्ल्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 22:24 IST

सर्वोच्च न्यायालय बॉम्बस्फोटात उडविण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय बॉम्बस्फोटात उडविण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा बंदोबस्त आणखी वाढविण्यात आला असून इंटर्न वकिलांसह सर्व अनोळखी व्यक्तींच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय वकिलांनाही परिसरातील संशयास्पद हालचालींबाबत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.दिल्ली पोलिसांना सोमवारी हा धमकी देणारा ई-मेल मिळाला होता. त्यानंतर सतर्कतेचे निर्देश देण्यात आले. अलीकडेच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फासावर चढविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, तेव्हापासून सर्वोच्च न्यायालय परिसर आणि आजूबाजूच्या भागात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या निवासस्थानी सोमवारी झालेल्या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या सचिव ऐश्वर्य भाटी यांनी एका पत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाला असलेला धोका लक्षात घेऊन अतिसुरक्षित क्षेत्रात सल्लामसलतीसाठी येणारे लोक, तसेच कायद्याच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश बंदीचा सरन्यायाधीशांचा प्रस्ताव आहे. या पत्रकात संघटनेच्या सदस्यांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली असून कुठलीही संशयास्पद हालचाल अथवा सामान आढळल्यास त्याची सूचना त्वरित न्यायालयाच्या सुरक्षेत असलेल्या पोलीस उपायुक्त कार्यालयास देण्याची विनंती करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)