शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

खासगी कंपन्यांना हजारो कोटी ‘भेट’?

By admin | Updated: August 1, 2016 01:34 IST

वीज कंपन्यांना दरवर्षी हजारो कोटी रुपये देण्याच्या करारांमध्ये स्वत:ला अडकवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- महाराष्ट्र, पंजाब यासारख्या काही प्रमुख राज्यांनी वीजेची प्रत्यक्षात खरेदी न करताच खाजगी वीज कंपन्यांना दरवर्षी हजारो कोटी रुपये देण्याच्या करारांमध्ये स्वत:ला अडकवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार महाराष्ट्राने खासगी कंपन्यांना दरवर्षी चार हजार कोटी रुपये देण्याची जबाबदारी डोक्यावर घेतली आहे तर, पंजाबने दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची. पंजाबने गेल्या दोन वर्षांचे मिळून चार हजार कोची रुपये खासगी कंपन्यांना अदा केले आहेत तर, महाराष्ट्राचे चार वर्षांचे मिळून १६ जहार कोटी रुपये द्यायचे बाकी आहेत.केंद्र सरकारमध्ये ऊर्जा, वित्त अशा खात्यांचे सचिव राहिलेले वरिष्ठ निवृत्त सनदीअधिकारी ई.एस. एस. सरमा यांनी भारताच्या नियंत्रक महालेखापरीक्षकांना (कॅग) लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. राज्याला वीजेची गरज असो वा नसो राज्य सरकारला या खाजगी कंपन्यांना प्रतिवर्षी ठराविक रक्कम अदा करावीच लागेल, असे ‘डीम्ड जनरेशनल पर्चेस’ कलम खाजगी कंपन्यांशी केलेल्या वीज खरेदी करारांमध्ये (पॉवर पर्चेस अ‍ॅग्रिमेंट /पीपीए)मधे नमूद असल्यामुळे हा खेळ सुरू आहे. वीज बीलांच्या माध्यमातून ही रक्कम अंतत: ग्राहकांकडूनच वसूल करण्यात येईल, असेही सरना यांनी पत्रात नमूद केले आहे.सरमा पत्रात म्हणतात की, सन २००३ च्या इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्टनुसार करण्यात येणाऱ्या वीज खरेदी करारात एक ‘डीम्ड पर्चेस’ कलम आहे. त्यात असे नमूद आहे की राज्यात ज्या वीज कंपन्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करतील, त्यांच्याकडून वीजेची खरेदी होवो अथवा न होवो, राज्य सरकार या करारान्वये त्यांना एक निश्चित रक्कम दरवर्षी अदा करील. या कलमाला अनुसरून महाराष्ट्राला दरवर्षी ४ हजार कोटींची तर पंजाब सरकारला २ हजार कोटींची रक्कम अदा करावी लागते.काही बातम्यांचा संदर्भ देत सरमा आपल्या पत्रात म्हणतात, पंजाब सरकारने अलीकडेच २ वर्षांचे ४ हजार कोटी रूपये खाजगी कंपन्यांना अदा केले तर महाराष्ट्र सरकारचे ४ वर्षांचे १६ हजार कोटी रूपयांचे देणे बाकी आहे. ।ही लूट कशी थांबवावी?राज्य सरकारचे माधयम वापरून वीज ग्राहकांना लुटणारा हा खेळ थांबवण्यासाठी सरमांनी काही सक्त उपायही आपल्या पत्रात सुचवले आहेत. ते म्हणतात, सर्वप्रथम राज्य सरकारने खाजगी वीज कंपन्यांशी थेट करार करणे टाळले पाहिजे. समजा एखाद्या राज्याला वीज खरेदी करार करणे अगदीच गरजेचे असेल तर किमानपक्षी त्या करारातून डिम्ड जनरेशनल पर्चेस कलम त्याने काढून टाकले पाहिजे. वीज कंपन्यांतर्फे तयार होणाऱ्या विजेच्या विक्रीची जबाबदारी संबंधित खाजगी कंपन्यानीच उचलायला हवी, अशी सक्ती त्यांच्यावर केली पाहिजे.