शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणमधून दररोज हजार टन कांदा आयात

By admin | Updated: August 28, 2015 23:49 IST

कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तसह इतर देशांतून त्याची आयात करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता अफगाणिस्तानमधून दररोज एक हजार टन माल भारतात येत आहे.

चंदीगड : कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तसह इतर देशांतून त्याची आयात करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता अफगाणिस्तानमधून दररोज एक हजार टन माल भारतात येत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील ग्राहकांना दरात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अट्टारी - वाघा महामार्गाद्वारे हा कांदा ट्रकमधून पंजाबमध्ये आयात केला जात आहे. अजून पुढील १५-२० दिवस कांद्याची आयात सुरू राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. दररोज किमान २० ते २५ ट्रकद्वारे अफगानिस्तातून एक हजार टन कांद्याची आयात केली जात आहे, असे कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री या संघटनेचे माजी अध्यक्ष (अमृतसर विभाग) राजदीप उप्पल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी केवळ ६-७ ट्रक माल अफगाणिस्तानमधून येत होता. आता त्यात वाढ झाल्याचे उप्पल म्हणाले. आयात केलेला माल पंजाब, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणात पाठविला जात आहे. त्यामुळे तेथील भाव काही प्रमाणात नियंत्रित राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अफगाणिस्तामधून आयात केलेल्या कांद्याचा घाऊक दर १५ ते ३० रुपये किलो आहे. पंजाबमध्ये किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर किलोमागे ६० रुपयांच्या वर असल्याने अफगाणिस्तानातून आयात केलेल्या मालामुळे दरवाढीला चाप लागू शकतो, असे व्यापाऱ्यांना वाटते. पाकिस्तानमध्येही अपेक्षित पीक न आल्याने तेथून कांद्याची निर्यात करण्यास व्यापारी इच्छुक नाहीत. कांद्याच्या टंचाईमुळे पंजाबमधील व्यापाऱ्यांनी जानेवारी २०११ मध्ये पाकिस्तानमधून तर सप्टेंबर २०१३ मध्ये अफगाणिस्तानातून माल आयात केला होता. अफगाणिस्तानचा कांदा स्वस्त असला तरी त्याचा दर्जा भारतीय कांद्याच्या तुलनेत चांगला नाही.