त्रिशूर : सेंट थॉमस कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाºया पुजाºयाला पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंगळवारी येथे एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. पोलीस प्रमुख यतीश चंद्रा यांनी सांगितले की, रविवारी रात्री नशेतील जयरामन याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली. याच ठिकाणी राष्ट्रपतींचा कार्यक्रम होणार आहे. चौकशीत या व्यक्तीने स्वीकार केले की, त्याने नशेत हा फोन केला होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 04:42 IST