शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

त्या मुस्लिमांना पाकिस्तानची वाट मोकळी

By admin | Updated: November 23, 2015 09:44 IST

भारतात आपला छळ होत आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम पाकिस्तानात जाण्यास मोकळे आहेत, असे वक्तव्य आसामचे राज्यपाला आचार्य यांनी केले

गुवाहाटी : ‘हिंदुस्तान फक्त हिंदूंचाच’ असे वक्तव्य करून नव्या वादाला जन्म देणारे आसामचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी; ‘भारतीय मुस्लीम पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मोकळे आहेत,’ असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य करीत हा वाद अधिकच चिघळवला आहे. या ‘विभाजनकारी’ वक्तव्याबद्दल आचार्य यांना राज्यपालपदावरून हटविण्यात यावे, अशी जोरदार मागणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली.आचार्य हे एका राज्याचे संवैधानिक प्रमुख म्हणून काम करण्यापेक्षा ‘आरएसएसचे प्रचारक’ म्हणूनच जास्त काम करीत आहेत, असा आरोप गोगोई यांनी केला. तर आचार्य यांचे हे वक्तव्य आरएसएस आणि भाजपाच्या दादरी हत्याकांडसारख्या घटनांना जन्म देणाऱ्या विभाजनवादी विचारधारेचे निदर्शक असल्याची टीका काँग्रेसने केली.शनिवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना आचार्य यांनी ‘हिंदुस्तानात फक्त हिंदूच राहू शकतात’ असे वक्तव्य केले होते. रविवारी त्यावर स्पष्टीकरण देतानाही त्यांनी दुसरे वादग्रस्त वक्तव्य करून वाद अधिक चिघळविला. ‘देशात आपला छळ होतो आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम कुठेही जाण्यास मोकळे आहेत. पाकिस्तान अथवा बांगला देशात जाण्याची त्यांची इच्छा असेल तर ते तेथे जाण्यास मोकळे आहेत. त्यांच्यापैकी बरेच पाकिस्तानमध्ये गेले आहेत,’ असे आचार्य म्हणाले.

 
‘हिंदुस्तान केवळ हिंदुंचाच आहे. त्यात गैर असे काही नाही. विविध देशांमधील हिंदू येथे भारतात येऊन राहू शकतात. ते परके नाहीत,’ असेही आचार्य यांनी स्पष्ट केले. आपल्या शनिवारच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्याचे पाहून आचार्य यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला आणि आपले स्पष्टीकरण दिले. 
ते म्हणाले, ‘हिंदुस्तान केवळ हिंदूंसाठीच आहे असे मला म्हणायचे नव्हते. तर जगात कुठेही छळल्या जाणा:या हिंदूंना भारतात आश्रय घेण्याचा हक्क आहे, असा माङया म्हणण्याचा अर्थ होता. परदेशात छळ होत असलेल्या मुस्लिमांसह सर्व भारतीय वंशाच्या लोकांचे येथे स्वागत आहे. जगात भारत सर्वात सहिष्णू देश आहे. येथे आम्ही सर्वाना सुरक्षित स्थळ उपलब्ध करून देतो. भारताचे मन मोठे आहे.’
‘बांगला देश आणि अन्य देशात छळ होत असलेल्या कोणत्याही भारतीय वंशाच्या लोकांना भारतात येण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि त्यांचे स्वागत करणो हे आमचे कर्तव्य आहे. मुस्लिमांसह सर्व धर्माच्या लोकांना भारतात येण्याचा अधिकार आहे,’असे आचार्य यांनी सांगितले. 
(वृत्तसंस्था)
————————-