शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

३०० नॉटिकल मैल परिसरात ‘त्या’ बेपत्ता विमानाचा शोध

By admin | Updated: July 26, 2016 01:27 IST

येथून पोर्ट ब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या एएन-३२ विमानाचा ठावठिकाणा अद्याप लागत नसल्याने काळजीत भर पडत आहे.

चेन्नई : येथून पोर्ट ब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या एन-३२ विमानाचा ठावठिकाणा अद्याप लागत नसल्याने काळजीत भर पडत आहे. आम्हाला अद्याप त्या विमानाचा वा त्याच्या अवशेषांचा, त्या विमानात असलेल्या एकाचाही शोध लागलेला नाही, असे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवामानात सुधारणा झाल्याने तपास कामाला गती देण्यात आली आहे. विमानाच्या शोधासाठी उपग्रहाची मदत घेण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. बेपत्ता विमानाचा चार दिवसांपासून शोध सुरू आहे. (वृत्तसंस्था)

- बंगालच्या खाडीत हवाई क्षेत्रात ३६० ते ३०० मिल भागात हा शोध सुरू आहे, तर समुद्रात १२० मिल लांब व रुंद भागात याचा शोध सुरू आहे. हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर विमानाचे तुकडे झाले असतील तर त्याचे अवशेष सापडू शकतात; परंतु जर विमान थेट समुद्रात कोसळले असेल तर अशा घटनांत साधारणपणे तपासासाठी एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो. - समुद्रात ३५०० मीटर खोलीपर्यंत तपास केला जात आहे. शुक्रवारी सकाळी चेन्नईजवळच्या विमानतळावरून या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच या विमानाचा संपर्क तुटला होता. हवाई दलाच्या चालकांसह सहा जणांसह विमानात २९ जण होते. या विमानाचा शोध घेण्यासाठी १२ जहाजांची मदत घेतली जात आहे. हवाई दलाची विमानेतही तपासकार्यात सहभागी आहेत.उपग्रहाच्या माध्यमातून शोध घेण्यासाठी आम्ही इस्रोची मदत मागितली आहे. उपग्रह चित्र काही वस्तंूूचे संकेत देत आहेत; पण या विमानाबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही. वातावरणात सुधारणा झाल्याने तपास कार्याला गती देण्यात येत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.