शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

तेरा चरखा ले गया चोर!

By admin | Updated: January 14, 2017 05:28 IST

खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायऱ्यांवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याची तीव्र प्रतिक्रिया

नवी दिल्ली : खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायऱ्यांवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये उमटली आहे. मोदी यांना महात्मा गांधी यांची जागा कधीच घेता येणार नाही, यापासून, त्यांना गांधीजी बनण्याची आणि बनवण्याची इतकी घाई का झाली, असे सवालही काहींनी विचारले. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी तर तेरा चरखा ले गये चोर असेच ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये,सून ले बापू ये पैगाम, मेरी चिठ्ठी तेरे नाम या गाण्यांचे शब्द वापरून पुढेतेरा चरखा ले गया चोरअशा ओळी जोडल्या आहेत.बापूंनीच खादी-ग्रामोद्योग आयोगाला रामराम करण्याची वेळ आली आहे. गांधीजी व खादीतील नातेच आयोगाने संपवून टाकले आहे. मोदींना १० लाखांचा सूट आवडतो. स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेली मंडळी खादीचे महत्त्व समजू शकणार नाहीत, असे तुषार गांधी म्हणाले.मोदींच्या छायाचित्राला शिवसेनेचा विरोधशिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्यावर कायम टीकाच केली आहे. मात्र खादी व ग्रामोद्योगच्या डायरी व कॅलेंडरवर गांधीजींऐवजी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्याच्या निर्णयाला शिवसेनेनेही विरोध केला आहे. आयोगातील कर्मचारी संघटनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे. मात्र खादी व ग्रामोद्योग आयोगाने आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी खादीचा प्रचार व प्रसार केल्यामुळे खादीच्या वापरात प्रचंड वाढ झाली आणि त्यामुळेच आम्ही त्यांचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेतला, असे आयोगाने म्हटले आहे.