शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२५ वाळूगटांसाठी तिसर्‍यांदा निविदा प्रक्रिया पर्यावरणची परवानगी प्राप्त : ठेकेदारांना लिलावाची रक्कम भरण्यासाठी पत्रव्यवहार

By admin | Updated: January 13, 2016 22:48 IST

जळगाव : जिल्‘ातील गिरणासह अन्य नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची तिसर्‍यांदा ऑन लाईन प्रक्रिया करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, संपूर्ण ४४ वाळू गटांना पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यानुसार लिलाव झालेल्या वाळू गटांचे पैसे भरण्यासाठी प्रशासनाने ठेकेदारांना पत्र दिले आहेत.

जळगाव : जिल्‘ातील गिरणासह अन्य नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची तिसर्‍यांदा ऑन लाईन प्रक्रिया करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, संपूर्ण ४४ वाळू गटांना पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यानुसार लिलाव झालेल्या वाळू गटांचे पैसे भरण्यासाठी प्रशासनाने ठेकेदारांना पत्र दिले आहेत.
तिसर्‍यांदा निविदा प्रक्रियेच्या हालचाली
जिल्हा प्रशासनाने यापूर्वी ४४ वाळू गटांची ऑन लाईन लिलावाची प्रक्रिया राबविली होती. त्यापैकी १६ वाळू गटांचा लिलाव होऊन १६ कोटींच्या जवळपास निधी शासनाला मिळाला. या दरम्यान २८ गटांना ऑन लाईन निविदा प्रक्रियेत प्रतिसाद मिळाला नसल्याने जिल्हा प्रशासनाने दुसर्‍यांदा निविदा प्रक्रिया राबविली. त्यात भडगाव तालुक्यातील सावदे व जळगाव तालुक्यातील जामोद या दोनच गटांना प्रतिसाद मिळाला आहे. सावदे वाळू गटासाठी ६६ लाख ८८ हजार तर जामोद वाळू गटांसाठी ३५ लाख ५२ हजारांचा लिलाव झाला. प्रतिसाद न मिळालेल्या २५ वाळू गटांसाठी पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.
पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्त
जिल्हा प्रशासनातर्फे ४४ वाळू गटांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र या गटांना पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नव्हती. मंगळवारी पर्यावरण विभागाच्या परवानगीचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वाळू ठेकेदारांना वाळू गटाची रक्कम भरण्याबाबतचे पत्र दिले आहे. या परवानगीत नव्या अटी टाकण्यात आहेत.
चौकट
या वाळू गटांसाठी होणार नव्याने निविदा प्रक्रिया
अमळनेर तालुका- मांडळ भाग १, मांडळ भाग-२, मुडी प्र.डां., बोदर्डे. चोपडा तालुका- तांदलवाडी भाग-२, खाचणे.
मुक्ताईनगर तालुका- पातोंडी, भोकरी. एरंडोल तालुका- उत्राण गु.ह. भाग- ४. धरणगाव तालुका - बांभोरी प्र.चा. भाग-१, चांदसर बु., चोरगाव, रेल, बाभुळगाव.पाचोरा तालुका- दुसखेडा, परधाडे, कुरंगी भाग-१. भडगाव तालुका- पिंपळगाव बु., कराब-वडघे, वडजी भाग २, टोणगाव , पांढरद, पिचर्डे, दलवाडे, कोठली या गटांचा समावेश आहे.