कल्याण : उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवशीपर्यंत केवळ अर्ज घेण्याचीच लगबग दिसून आली आहे. आतापर्यंत ३४ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले असून घटस्थापनेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊ शकते.कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज घेणे आणि दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी १३ जणांनी, त्यानंतर सोमवारी २२ सप्टेंबरला १७ तर मंगळवार २३ सप्टेंबर चौघांनी असे तीन दिवसांत ३४ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. परंतु, कोणाकडूनही आजवर उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २९ ही अंतिम तारीख आहे. अमावस्येनंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होण्याची शक्यता पाहता येत्या ४ दिवसांत यंत्रणेची चांगलीच कसरत होणार आहे. (प्रतिनिधी)
तिस-या दिवशीही पाटी कोरीच
By admin | Updated: September 25, 2014 01:24 IST