शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुली सुरूच राहणार दुष्काळात तेरावा महिना : ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीच्या गावांना अल्पशा सवलती

By admin | Updated: January 7, 2016 23:10 IST

सेंट्रल डेस्कसाठी

जळगाव- खरीप व रब्बी हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या राज्यातील १४ हजार ७०८ दुष्काळी गावांसाठी महसूल व वनविभागाने अल्पशा सवलती जाहीर करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नवीन उपाययोजनांमध्ये शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती राहणार नाही तसेच सहकारी कर्जाचे पुनर्गठणही होणार नसल्याचे शेतकर्‍यांची आणखी कोंडी होणार आहे. मागील म्हणजेच २०१४-१५ च्या हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांसाठी ज्या उपाययोजना जाहीर झाल्या होत्या त्यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, कृषि पंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, १० वी, १२ वीच्या परीक्षा शुल्कात माफी, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथीलता, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर, शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना जाहीर झाल्या होत्या. त्या हंगामात १९ हजार ५९ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली होती. २०१५-१६ च्या हंगामात उपाययोजनांना कात्री२०१५-१६ च्या हंगामात दुष्काळी किंवा ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांची संख्या मागील हंगामाच्या तुलनेत कमी असून उपाययोजनांनाही कात्री लावण्यात आली आहे. जमीन महसुलात सूट, कृषि पंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर, दुष्काळी स्थिती जाहीर असलेल्या गावात शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना जाहीर झाल्या आहेत. सहकारी कर्जाचे पुनर्गठण व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या उपाययोजना २०१५-१६ च्या हंगामातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर असलेल्या गावांसाठी लागू केलेल्या नाहीत. यामुळे शेतकर्‍यांकडून पीक कर्ज वसूल केले जाईल हे स्पष्ट होते. सर्वाधिक दुष्काळी गावे नाशिक जिल्ह्यात, कोकणात एकही गाव नाहीमहसूल व वन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक १५७७ दुष्काळी गावे नाशिक जिल्ह्यात आहेत. यापाठोपाठ नांदेडात १५६२ गावे दुष्काळी आहेत. तर कोकणात एकाही गावात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेली नाही किंवा दुष्काळ जाहीर झालेला नाही.