शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी दोन पदव्यांवर अभ्यास करू देण्यावर विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:35 IST

विद्यापीठ अनुदान आयोग, दुसऱ्यांदा नेमली समिती

नवी दिल्ली : एकाच किंवा दोन वेगवेगळ्या विद्यापीठांतून एकाच वेळी दोन पदव्यांचा अर्धवेळ, बहि:शाल पद्धतीने किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास करता येईल का, याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक समिती नेमली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन या समितीचे प्रमुख आहेत.

या विषयाबद्दल अशा प्रकारची समिती काही पहिल्यांदाच नेमण्यात आलेली नाही. २०१२ सालीही विद्यापीठ अनुदान आयोगाने हैदराबाद विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू फरकान कमर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर त्यावर चर्चाही झाली होती. मात्र, त्यातून पुढे काहीही निष्पन्न झाले नाही. एका पदवी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला त्याचवेळी त्याच किंवा दुसºया विद्यापीठाच्या अन्य पदवी अभ्यासक्रमासाठीही बहि:शाल किंवा इतर पद्धतीने प्रवेश देण्यात यावा, अशी शिफारस कमर समितीने केली होती.या समितीने आपल्या अहवालात म्हटले होते की, दोन पदव्यांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमांना एकाच वेळी प्रवेश देऊ नये. कारण त्यामुळे शैक्षणिक, प्रशासकीय व साधनसामग्रीचे प्रश्न निर्माण होतील. एखाद्या पदवी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला त्याचवेळी डिप्लोमा, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा, पदव्युत्तर डिप्लोमा करण्यास परवानगी द्यावी.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने होणार तपासणीविद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, फरकान कमर यांच्या समितीने दिलेल्या अहवालावर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वैधानिक समितीने आपला अनुकूल अभिप्राय दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन पदव्यांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भातील विचार त्यावेळी बासनात गुंडाळला गेला. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच वेळी दोन पदव्यांचा अभ्यास करणे कदाचित शक्य होऊ शकते. त्या सर्व शक्यतांचा विचार करण्यासाठी नवी समिती नेमण्यात आली आहे.