चोरट्याला पकडले अन् बदडले
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
प्रतापनगरातील घटना : दागिने जप्त
चोरट्याला पकडले अन् बदडले
प्रतापनगरातील घटना : दागिने जप्त नागपूर : घरातील दागिने चोरून पळू पाहाणाऱ्या चोरट्याला घरमालकाने नागरिकांच्या मदतीने पकडले. त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले. प्रतापनगरात गुरुवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. त्रिमूर्तीनगरात जागनाथ उमराव पराते (वय ६६) हे राहतात. गुरुवारी दुपारी ते बाहेरून घरी आले. तेवढ्यात एक तरुण त्यांना घरातून निघताना दिसला. त्याला कोण आहे, अशी विचारणा केली तेव्हा त्याने इलेक्ट्रीशियन असल्याची बतावणी केली आणि पळू लागला. पराते यांना संशय आल्यामुळे त्यांनी आरडाओरड करीत आरोपीचा पाठलाग करून नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले. भीमरत्न रामदास गाडेकर (वय २७, रा. जयताळा) नामक हा तरुण चोरटा असल्याचे आणि त्याने पराते यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरले होते, असेही स्पष्ट झाले. त्यामुळे जमावाने गाडेकरची धुलाई केली. त्याला नंतर प्रतापनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी गाडेकरला चोरीच्या आरोपाखाली अटक केली.-----