शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

चोऱ्या / घरफोड्या

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

अजनीत चाकूच्या धाकावर लुटमार

अजनीत चाकूच्या धाकावर लुटमार
नागपूर : चाकूचा धाक दाखवून एका तरुणाला त्याच्या घरासमोर लुटल्याची घटना अजनीत घडली. संजय सोहनलाल सहारे (वय २९) हे रात्री ११.४५ ला कामावरून घरी परतले. दार उघडत असताना मोटरसायलवरील दोन तरुणांनी त्यांना रोखले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोख २ हजार, मोबाईल आणि एटीएम कार्ड हिसकावून नेले. या कार्डचा गैरवापर करून लुटारूंनी २३,५०० रुपये काढून घेतले. सहारेंच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----
एमआयडीसी, सीताबर्डीत घरफोडी
नागपूर : एमआयडीसी आणि सीताबर्डीत घरफोडीच्या दोन घटना घडल्या. एमआयडीसीत टायको इंडिया कंपनीची भिंत तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी १५ हजारांचे लोखंडी अँगल चोरून नेले. आज सकाळी ८.३० वाजता ही घटना उघडकीस आली. खेमराज मोतीरामजी नंदरे (वय ३४) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अशाच प्रकारे एमपी बसस्थानकासमोरचे व्यापारी संकुलातील एस. ए. मोबाईल शॉपीची भिंत फोडून चोरट्यांनी १ हजार रोख, मोबाईल आणि इतर वस्तूंसह ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सुरेश निंबाजी आवारे (वय ५२) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.
------
जरीपटक्यात चोरी
नागपूर : इंदोरा बारा खोली मागे, श्रावस्ती बौध्द विहाराजवळ राहणारे कमल गोपीचंद मुंगाटे (वय ४२) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ४० हजार तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ६९ हजारांचा ऐवज चोरून नेला. १९ ते २० जानेवारी दरम्यान ही घटना उघडकीस आली. मंुगाटे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे
--
लुटमारीचा प्रयत्न फसला
नागपूर : व्यापाऱ्याने आरडाओरड केल्यामुळे चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्याच्या प्रयत्नात असलेले आरोपी पळून गेले. जरीपटक्यात १८ जानेवारीला रात्री ८.१५ वाजता ही घटना घडली.
पवन सावलदास शुभवानी (वय ३०) हे आपल्या पॉवर ग्रीड चौकातील सावलदास डेली निड्स या दुकानात हजर होते. तोंडाला कपडा बांधून आलेल्या तिन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रयत्न केला. शुभवानी यांनी जोरात आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यामुळे लुटारू पळून गेले. शुभवानी यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.