शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' चकमकीचा बदला घेणार, दहशतवादी संघटनेची धमकी

By admin | Updated: April 19, 2015 12:45 IST

तेलंगणमधील सिमीच्या दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लश्कर ए योतबा व इंडियन मुजाहिदीन भारतात बाँबस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 19 - तेलंगणमधील सिमीच्या दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लश्कर ए योतबा व इंडियन मुजाहिदीन भारतात बाँबस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. दहशतवादी संघटनांच्या रडारवर आता पोलिस अधिकारी आहेत.

तेलंगणमध्ये 4 एप्रिल रोजी सिमीच्या दोन दहशतवाद्यांचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला होता. या अझीजुद्दीन व मोहम्मद अस्लम या दोघा दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. चेन्नई, पुणे व बंगळुरु येथील बाँबस्फोटांमध्ये या दोघांचा सहभाग होता. या दोघांच्या मृत्यूनंतर लश्कर ए तोयबा व इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांनी भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या हाती इंडियन मुजाहिदीनचा रियाझ भटकळ व त्याच्या भारतातील साथीदारांचे फोन रेकॉर्डिंग आली आहे. या संभाषणात 'बदला घेणार' असा शब्द वापरण्यात आल्याने गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सिमीच्या दहशतवाद्यांचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी भटकळ, लश्कर ए तोयबाच्या मदतीने पोलिस अधिका-यांवर हल्ला करण्याचा कट रचत आहे. ही माहिती आता तेलंगणमध्ये पोलिस अधिका-यांनी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.