शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तिघे वाहून गेले

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

तिघे वाहून गेले

तिघे वाहून गेले
चिमुकला, विद्यार्थी आणि शिक्षकाचा समावेश
नागपूर : पुरामध्ये तीन जण वाहून गेल्याची घटना मौदा, खापरखेडा आणि उमरेड परिसरात घडली. यामध्ये चिमुकल्यासह एक विद्यार्थी आणि शिक्षकाचा समावेश आहे. यापैकी चिमुकल्यासह विद्यार्थ्याचा मृतदेह मिळाला, मात्र शिक्षकाचा पत्ता लागू शकला नाही. रणवीर घनश्याम धुपारे (१४, रा. कोराड, ता. मौदा) असे मृत विद्यार्थ्याचे, दक्ष विजय सलाम (अडीच वर्षे, रा. नवेगाव साधू ता. उमरेड) असे चिमुकल्याचे तर कृष्णा जंगलू चापके (४५, रा. मोहपा, ता. कळमेश्वर) असे वाहून गेलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
रणवीर हा शाळेत सायकलने जात होता. दरम्यान, तारसा नजीकच्या सांड नदीला आलेल्या पुरामुळे पूल पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी वाहत असताना त्याने सायकल नेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो वाहून गेला. काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. शिक्षक कृष्णा चापके हे त्यांचा मित्र राहुल रामकृष्ण मोहकर (३५) यांच्यासह मोहपा येथून एमएच-४०/२०४० क्रमांकाच्या मोटरसायकलने शाळेत जाण्यासाठी निघाले. वाटेत लोणखैरी पुलावरून पाणी असल्याने कृष्णा मोटरसायकलहून उतरले आणि ते दोघेही मोटरसायकल हातात घेऊन पायी चालू लागले. त्यांचा मित्र पुढे होता. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहाने ते मोटरसायकलसह वाहून गेले. ते सायंकाळपर्यंत कुठेही आढळून आले नाही. याबाबत खापरखेडा पोलिसांनी हरविल्याची नोंद केली असून तपासकार्य सुरू आहे. कृष्णा हे महादुला येथील स्मिता पाटील विद्यालयात तर कोराडी येथील पंजाबराव धोटे महाविद्यालयात त्यांचा मित्र राहुल अध्यापक आहे.
उमरेड तालुक्यातील नवेगाव साधू येथे गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अडीच वर्षांचा दक्ष विजय सलाम हा वाहून गेला. त्याच्या घरामागे एक नाला असून सकाळी ८ वाजताच्या सुमारास दक्ष आणि त्याचा मोठा भाऊ विपुल (५) दोघेही नाल्याच्या काठावर उभे होते. अशातच दक्षचा तोल गेला आणि तो नाल्यात पडला. लागलीच विपुलने आईला याबाबत सांगितले. आरडाओरड सुरू झाली. गावातील सुमारे २० ते २५ नागरिकांनी परिसर पिंजून काढला. बरीच शोधाशोध केल्यानंतर सकाळी ११ वाजता दक्षचा मृतदेह एका झुडपात आढळून आला.