नवी दिल्ली : सिंडिकेट बँकेचे निलंबित मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. के. जैन यांनी प्रकाश इंडस्ट्रीज व भूषण स्टील या कंपन्यांचे वसूल न होणारे 1क्क् कोटींपेक्षाही जास्त रुपयांचे कर्ज वसूल होऊ (एनपीएन) शकणार नाही, असे जाहीर होण्यापासून रोखल्याचे केंद्रीय गुप्तचर खात्याच्या सूत्रंनी सांगितले. ज्या कंपनीचे कर्ज वसूल होऊ शकत नाही, असे जाहीर झाल्यास त्या कंपनीला पुढे बँकांकडून कर्ज मिळविणो कठीण आणि महाग होण्याची शक्यता असते. वरील दोन कंपन्यांना पत मर्यादा (क्रेडिट लिमिट) वाढवून देण्यासाठी जैन यांना 5क् लाख रुपयांची लाच घेताना 2 ऑगस्ट रोजी अटक झाली होती.
सीबीआयच्या सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार जैन लाचेच्या रकमेबाबत कंपन्यांशी थेट बोलणी करायचे व एकदा व्यवहार निश्चित झाला की पैसे मिळविण्यासाठी हवालाचे माध्यम वापरायचे. भूषण स्टीलचे 1क्क् कोटी रुपयांचे कर्ज एनपीएन जाहीर न करण्यासाठी जैन यांनी 5क् लाख रुपये लाच घेतली. असाच व्यवहार प्रकाश इंडस्ट्रीजबरोबरही झाला होता. त्या लाचेचाही तपास केला जात आहे. काही कंपन्यांचे कर्ज वाढवून देण्यासाठीही जैन यांनी लाच घेतल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानंतर जैन यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आर्थिक सेवा सचिव जी. एस. संधू यांनी सोमवारी दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)