शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

त्या सर्वांची चांगल्या आयुष्याची स्वप्ने भंगली!

By admin | Updated: October 2, 2016 00:38 IST

घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने

नवी दिल्ली : घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने बिहारमधील ४0 जण आपल्या कुटुंबियांना सोडून सौदी अरबमध्ये रोजगारासाठी गेले खरे: पण त्यांना तिथून अक्षरश: रिकाम्या हातानेच यावे लागले आहे. ही कहाणी केवळ भारतातील कामगारांची नाही. पाकिस्तान, बांगला देश आणि फिलिपाइन्समधील मजुरांचीही हीच स्थिती झाली.भारतातील कामगार तिथे रोजगारासाठी गेले, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे त्यांना केवळ रोजगारच मिळाला असे नाही, तर हातात पैसाही बऱ्यापैकी खुळखुळू लागला. त्यामुळे ते आनंदात होते. काही महिने त्यांनी बऱ्यापैकी रकमा भारतातील कुटुंबियांना पाठवल्या. त्यामुळे त्यांच्या भारतातील नातेवाईकांमध्येही खुशीचे वातावरण होते. कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचा दीर, कोणाचा भाउ असे बिहारमधील किमान ४0 जण याप्रकारे मस्त मजेत जगत होते. लेबनानचे माजी पंतप्रधान आणि कोट्यधीश असलेले साद हरीरी यांच्या तेल कंपनीत त्यांना रोजगार मिळाला होता. तिथे ५0 हजार कामगार काम करीत होते. पण अचानक तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सुरू झाली. घसरणही इतकी मोठी की व्यवस्थापनाने तेथील कँटीन बंद करून टाकले. त्यामुळे जेवण मिळेनासे झाले. मग प्यायला पाणीही मिळेना. वीजपुरवठाही थांबवण्यात आला. रोजगारही गेलाच. अनेकांना महिन्याचा पगारही मिळाला नाही.त्यातच परत येण्यासाठी पैसा नाही. काहींच्या हातात थोडे पैसे होते. पण त्यांचे पासपोर्ट, वर्किंग व्हिासाची कागदपत्रे एक तर कंपन्या, व्यवस्थापन वा दलाल यांनी त्यांच्याकडून काढून घेतले होते. त्यामुळे भारतात परतणेही शक्य नव्हते. माझ्या मालकाने माझ्या कागदपत्रांचे नुतनीकरणच केले नव्हते. त्यामुळे मला अटक करण्यात आली... २७ वर्षांच्या हुसेन सांगत होता. तो सौदी राजाच्या रियाधमधील राजवाड्याच्या नुतनीकरणात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. अर्थात कंत्राटी कामगार म्हणून. तेथील नियमाप्रमाणे त्याला दुसरे काम शोधायची संमती नव्हती. संतोष या बांधकाम मजुराचीही हीच स्थिती होती. पगारही इथे सांगितला, त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी दिला गेला. सिवान जिल्ह्यातील झाकीर हुसेन म्हणाला की, आमच्या गावात दवंडी पिटून नोकरीसाठी नेण्यात आले. दरमहा ३0 हजार रुपये पगार मिळेल, असे सांगितले गेले. पण माझी आताची स्थिती पाहा. मला डिसेंबरपासून पगारच मिळाला नाही. भारत सरकारने आम्हाला इथे आणले, म्हणून दिल्लीपर्यंत तरी आम्ही पोहोचलो. आमच्यापैकी एकाच्याही खिशात दमडी नाही. सरकारच्या खर्चानेच आता येथून घरी जाणार आहोत. रेल्वेची वाट पाहतोय आम्ही सारे...हुसेन म्हणाला. बाकीच्यांनी त्याच्या म्हणण्यावर नुसती मान डोलावली. त्या सर्र्वाची अवस्था अशीच होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)