शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

ते अस्वस्थ सात तास !

By admin | Updated: July 31, 2015 00:22 IST

- अख्खे कारागृह रात्रभर जागले

- अख्खे कारागृह रात्रभर जागले
नरेश डोंगरे
नागपूर : तब्बल २९ वर्षांनंतर फाशीच्या शिक्षेचा ताण अनुभवणार्‍या कारागृहात बुधवारची रात्र कमालीच गडद झाली. रात्रभर हे कारागृह जागे होते. मात्र, प्रत्येकाच्याच मनावर ताण होता. रात्री १२ ते सकाळी ७ या सात तासांतील घडामोडींमुळे तुरुंग प्रशासनावर ताण वाढला. मात्र, सकाळी ७ वाजता फासावर लटकवून याकूब मेमनचा श्वास रोखला अन् तुरुंगात उपस्थित असलेल्या सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.
२२ वर्षांपूर्वी देश हादरवून सोडणार्‍या मुंबईतील भीषण बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला गुरुवारी सकाळी ७ वाजता फासावर चढवले. एरवी स्मशानशांतता अनुभवणार्‍या फाशी यार्डात वारंवार अधिकारी, कर्मचारी अन् त्यांच्यासोबत खुल्या कारागृहातील काही कैदीही (बावा) जात-येत होते. त्यामुळे तेथील कर्णकर्कश ठोकपिट वाढली होती. परिणामी बुधवारी सायंकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे बराकी बंद झाल्या. कैद्यांचे जेवणही झाले. मात्र, झोपी कुणीच गेले नाही. फाशी यार्डातील भेसूर वातावरण बहुतांश जण अनुभवत होते.
मध्यरात्री अचानक फाशी यार्डातील धावपळ थांबली. आवाजही बंद झाले. त्यामुळे कैदीच नव्हे तर कर्मचार्‍यांचीही अस्वस्थता वाढली. काय झाले, त्याची उत्स्फूर्त चौकशी होऊ लागली. एरवी कैद्यांशी फटकून वागणारे सुरक्षा रक्षक कैद्यांना माहिती देऊ लागले. आपली अस्वस्थता दडवण्यासाठी आणि बाहेर काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या बराकीतील कैदी आलटून पालटून नैसर्गिक विधी आटोपण्याच्या बहाण्याने बराकीबाहेर येत होते.
तर दुसरीकडे रात्रभर कारागृह अधीक्षकांचा कक्ष सुरू होता. टीव्हीकडे अधिकार्‍यांच्या नजरा लागल्या होत्या. ते दिल्लीतील सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे नजर लावून बसले होते.
--------
याकूबचीही पापणी लागेना
याकूबच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती. तो कधी उठून बसत होता तर कधी उभा राहात होता. कधी दाराजवळ येत होता तर कधी दाराकडे पाठमोरा होऊन स्वत:शीच बोलत होता. त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या गार्डच्या ध्यानात त्याची तगमग आली होती. अर्थात् कारागृहातील प्रत्येकच व्यक्ती प्रचंड अस्वस्थ होती. तब्बल पावणेपाच तास ही अस्वस्थता राहिली, नव्हे ती मिनिटागणिक तीव्र होत गेली.
--
पहाटे सारेच कामाला लागले
पहाटे ४.५० वाजता एकसाथ अनेक अधिकारी फाशी यार्डाकडे धावले. कोर्टानं याकूबची याचिका फेटाळून लावल्याचे वृत्त कळाल्यामुळे त्यांनी ज्यांना जी जबाबदारी सोपवली होती, ती जबाबदारी तत्परतेने पार पाडण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, कारागृहातील सारेच कर्मचारी पटापट कामाला लागले. याकूबला आंघोळ घातली गेली. त्याच्याकडून पूजा-प्रार्थना करवून घेण्यात आली. त्याला नाश्ता देण्यात आला. अन् हे सर्व आटोपल्यानंतर त्याने केलेल्या कृत्याची जाणीव करून त्याबद्दल फाशी दिली जात असल्याची कल्पनाही देण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याला फासावर लटकवण्यात आले.
---
जीवघेणा संदेश
कारागृहातील या अस्वस्थ वातावरणातच मध्यरात्री सुलेमानच्या नावे एक लिफाफा तयार केला. रात्री १.४५ वाजता हा लिफाफा घेऊन दोन कर्मचारी सीताबर्डीतील हॉटेल द्वारकामध्ये आले. यावेळी सुलेमान आणि उस्मान टीव्हीवरील घडामोडींकडे टक लावून बघत होते. याकूबला सर्वोच्च न्यायालयातून आता तरी दिलासा मिळेल, अशी त्यांना आशा होती. याच वेळी लिफाफा मिळाल्यामुळे त्यांनी तो उघडला. त्यात एक पत्र होते. याकूबला सकाळी ७ वाजता फासावर टांगले जाणार, अशी त्यात माहिती होती. त्यामुळे सुलेमान आणि उस्मान अधिकच गंभीर झाले. पहाटे ४. ५० ला त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. त्यांचेही अवसान गळाले.