शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

हे असतील वर्ल्डकपचे सितारे

By admin | Updated: February 14, 2015 14:41 IST

त्येक संघात एकतरी ‘विजयाचा महामेरू’ दडलेला आहे. हे महामेरू यशस्वी ठरले तर सामन्यांचे चित्र नक्कीच पालटेल. प्रतिस्पर्धी संघांसाठी कोणते फलंदाज घातक ठरू शकतील.

आजपासून क्रिकेटचा विश्वसंग्राम रंगणार आहे. त्यासाठी चौदाही संघांनी ‘चांगली’ तयारी केली आहे. ११व्या विश्वचषकात दहा देशांतील संघ हे कसोटी खेळणारे आहेत, तर इतर चार म्हणजे, अफगाणिस्तान, आयर्लंड, संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि स्कॉटलँड वन-डे सामने खेळणारे आहेत. प्रत्येक संघात एकतरी ‘विजयाचा महामेरू’ दडलेला आहे. हे महामेरू यशस्वी ठरले तर सामन्यांचे चित्र नक्कीच पालटेल. प्रतिस्पर्धी संघांसाठी कोणते फलंदाज घातक ठरू शकतील, त्याचा हा एक आढावा...विराट कोहली (भारत)पोझिशन : मध्यमफळीतील फलंदाज विश्वचषकात तमाम भारतीयांचे डोळे विराटवर असतील. भारतीय संघातील एक परिपक्व खेळाडू म्हणून विराटकडे पाहिले जाते. कोणत्याही परिस्थितीत तो स्वत:ला सिद्ध करू शकतो. २०११ च्या विश्वचषकात वेस्ट इंडीजविरुद्ध विराटने ३५ धावांची ‘संकटमोचक’ खेळी केली होती. ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे. विराटला वन-डे क्रिकेटचाही चांगला अनुभव आहे. १४८ सामने खेळणाऱ्या विराटने ५१.८४ च्या सरासरीने सहा हजार धावा फटकारल्या आहेत. यात त्याच्या २१ शतकांचा समावेश आहे. भारताच्या या खेळाडूस एकदा का ‘लय’ गवसली तर तो प्रतिस्पर्धी संघांसाठी मोठी डोकेदुखी ठरेल. ए. बी. डिव्हिलियर्स(दक्षिण आफ्रिका)आधुनिक क्रिकेटमधील सर्वांत सक्षम खेळाडू म्हणून डिव्हिलियर्सकडे बघितले जाते. पेटोरियाचा हा ३० वर्षीय फलंदाज आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने प्रसिद्ध आहे. ‘टेम्पेरामेंट’ ही त्याची खासियत आहे. जगातील सगळ्याच गोलंदाजांचा सहज सामना करण्याची त्याच्यात ताकद आहे. २०१४ मध्ये तो आयसीसी कसोटी क्रिकेटच्या मानांकनात अव्वल फलंदाज होता. आता २०१५ मध्ये तो दुसऱ्या, तर वन-डे मानांकनातील अव्वल फलंदाज आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या डिव्हिलियर्सने कसोटीत ७८०० धावा केल्या आहेत. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात त्याने सर्वांत जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. अवघ्या ३१ चेंडूंत शतक ठोकत त्याने न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनचा विक्रम मोडला आहे. त्यामुळे या ‘डॅशिंग’ फलंदाजावर विश्वचषकात अनेकांच्या नजरा असतील.स्टिव्हन स्मिथ (आॅस्ट्रेलिया)आॅस्ट्रेलियातील हा उदयोन्मुख खेळाडू. भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील विक्रमी प्रदर्शनानंतर स्टिव्हन स्मिथला विश्वचषकाचे तिकीट मिळाले आहे.मायकल क्लार्क जखमी झाल्यानंतर त्याच्याकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपविण्यात आले. त्यात त्याने स्वत:ल सिद्ध केले. भारताविरुद्ध ७६९ धावांचा डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडून काढला. त्यामुळे ही कसोटी मालिका स्मिथसाठी स्वप्नवत ठरली होती. लेग स्पिनर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा स्मिथ आज धोकादायक फलंदाज म्हणून पुढे आला आहे. मैदानात हा फलंदाज ‘सेट’ झाल्यास तो गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरू शकतो. त्यामुळे आॅस्ट्रेलियाची बरीच मदार स्टिव्हनवर अवलंबून असेल. ब्रेंडन मॅक्क्यूलम (न्यूझीलंड)आधुनिक क्रिकेटमधील सर्वांत आक्रमक फलंदाजांमध्ये बें्रडन मॅक्क्युलमचे नाव आघाडीवर येते. ३३ वर्षीय हा खेळाडू सामन्याचे चित्र बदलून टाकण्यास एकटाच समर्थ आहे. बॅटिंग आॅर्डरमध्ये जरी बदल झाला तरी त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होत नाही. कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची ताकद या खेळाडूत आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. दोन शतकांसह त्याने २००० धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल (आॅस्ट्रेलिया)पोझिशन : मध्यमफळीतील फलंदाजलांब आणि ताकदी फटके मारून सामना फिरविण्याची ताकद या फलंदाजात आहे. व्हिक्टोरियाकडून खेळत असताना तास्मानियाविरुद्ध अवघ्या १९ चेंडूंत अर्धशतक ठोकल्यानंतर तो आॅस्ट्रेलियात स्थानिक क्रिकेटमध्येलक्षवेधी ठरला होता. त्याची आॅर्थाेडॉक्स फटकेबाजी आणि रिव्हर्स स्वीप कमालीचा आहे. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फिरकीपटू म्हणूनही तो संघासाठी अनमोल ठरतो. डेव्हिड वार्नर (आॅस्ट्रेलिया)कसोटी आणि वन-डे क्रिकेटपूर्वी या खेळाडूने टी-२० क्रिकेटमध्ये चमक दाखविली. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधील सर्वांत धोकादायक फलंदाज म्हणून तो पुढे आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ८९ धावांची अफलातून खेळी करीत त्याने आपली क्षमता सिद्ध केली. कसोटीसाठी त्याला फार संधी मिळाल्या नव्हत्या. मात्र, २०११ मध्ये जस्टीन लाँगर आणि मॅथ्यू हेडन यांच्या निवृत्तीनंतर वार्नरला कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. ५२ सामन्यांत त्याने तीन शतके आणि १० अर्धशतके झळकाविली आहेत. यंदाच्या विश्वचषकात हा फलंदाज धोकादायक ठरू शकतो. मिचेल जॉन्सन, आॅस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाचा हा डावखुरा भेदक गोलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जखडून ठेवण्याची क्षमता आहे. नवीन चेंडूवर तो समोरच्या फलंदाजाला बॅडफूटवर ढकलू शकतो. त्याच्यात एकापोठोपाठ संघासाठी ब्रेकथ्रू मिळवू देऊ शकतो. चेंडूला चांगल्या प्रकारे स्विंग करण्याची कला त्याला अवगत आहे. मिचेल ताशी १४० च्या वेगाने चेंडू टाकू शकतो. सध्या तो पूर्ण बहरात असून, सध्या त्याचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. प्रतिस्पर्धी संघासाठी मिचेल सर्वांत मोठा धोका असणार आहे. या स्पर्धेत कर्णधारास त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. लसिथ मलिंगा, श्रीलंकाश्रीलंकेचा हा वेगवान गोलंदाज आपल्या वेगवान माऱ्याने समोरील फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो. यॉरकर हे त्याच्या भात्यातील प्रमुख अस्त्र आहे. २००७ च्या विश्वचषकात त्याने १८ विकेट् घेऊन स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचबरोबर सलग चार चेंडूंवर चार विकेटसुद्धा त्याने घेतल्या आहेत. डेथ ओव्हरमध्येसुद्धा तो प्रभावी ठरू शकतो. मॉर्ने मॉर्केल, दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा गोलंदाज सध्या चांगल्या बहरात असून, तो आपल्या गोलंदाजीवर समोरील फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. नवीन चेंडूवर स्ंिवग करणे, त्याला उसळी देणे ही त्याची प्रमुख अस्त्रे आहेत. समोरील फलंदाजांना कसे व केव्हा चकवायचे हे त्याला चांगले अवगत आहे. संघाचा दुसरा गोलंदाज डेलबरोबर गोलंदाजी करताना तो नक्कीच समोरील फलंदाजांवर दडपण आणू शकतो. शाहिद आफ्रिदी, पाकिस्तान‘बूम बूम’ शाहीद आफ्रिदी कोणत्याही क्षणी घातकी खेळी करू शकतो. त्याच्या नावावर ३७ चेंडूंत शतक ठोकण्याचा विक्रम आहे. तसेच त्याच्या नावावर सर्वाधिक षटकार खेचण्याचाही विक्रम आहे. आपला शेवटचा विश्वचषक खेळणारा हा खेळाडू संघाला जेतेपद पटकावून देण्यासाठी सर्वस्व झोकून देईल. गोलंदाजीतही त्याची एक वेगळी शैली आहे आणि त्यावर फलंदाजांना तोडगा काढण्यात अपयश आले आहे. ख्रिस गेल, वेस्ट इंडिजनजर आणि हाताचा अचुक ताळमेळ राखून कोणत्याही चेंडूवर अप्रतिम फटकेबाजी करण्यात क्रिस गेलचा हातखंडा आहे. एकदा जम बसल्यास तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर दयामया दाखवत नाही. तंत्र आणि पदलालित्य यांचा व गेलचा काही संबंध नसला तरी त्याच्या फटक्यांमध्ये असलेली गती क्षेत्ररक्षकांना अचंबित करते. टी-२० स्पेशालिस्ट अशी त्याची ओळख आहे आणि त्याच शैलीत तो वन डेत व कसोटीत फलंदाजी करतो. जोस बटलर, इंग्लंडइंग्लंडच्या मधल्या फळीचा आधारस्तंभ म्हणून जोस बटलरकडे पाहिले जाते. यष्टीरक्षक म्हणून त्याला अजून सिद्ध करायचे असले तरी फलंदाज म्हणून त्याने संघाला आकर्षित केले आहे. विविध फटक्यांची आतषबाजी मारण्यासाठी बटलर ओळखला जातो. संघातील फिनिशरची जागा त्याने भरुन काढली आहे. पण तो खूप खालच्या क्रमांकावर खेळतो. कर्णधार मोर्गनने त्याचा चांगला उपयोग करुन घ्यायला हवा.ट्रेंट बोल्ट, न्यूझीलंडपंचवीस वर्षीय डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे. न्यूझीलंडच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक. बोटांच्या जादूने चेंडू लिलया स्विंग करण्याची त्याची क्षमता आहे. विशेषत: त्याचे इन स्विंग घातक मानले जाते. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी त्याचा स्विंग करण्याचा मारा अधिक धोकादायक आहे. तसेच तो १४३ किलोमीटर प्रतितास या वेगाने चेंडू टाकू शकतो. इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांत १९ बळी, वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात ८० धावांच्या मोबदल्यात दहा बळी, अशी त्याची सर्र्वोच्च कामगिरी आहे. जेम्स अँडरसन, इंग्लंडजेम्स अ‍ॅँडरसनवर या विश्वचषकमध्ये सर्वांत जास्त भिस्त असणार आहे. अ‍ॅँडरसनच्या गोलंदाजीवर आॅस्ट्रेलियन खेळपट्टीवर धावा काढणे फलंदाजांना सोपे असणार नाही. आपल्या गोलंदाजीत सुरुवातीपासून सातत्य राखणे हा त्याचा हातखंडा आहे. त्याचबरोबर चेंडूला योग्य दिशा देणे आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे त्याची खासियत आहे. तो चेंडूला स्विंगसुद्धा चांगल्या पद्धतीने देतो. स्टिवन फिन, इंग्लंडहा वेगवान गोलंदाज आॅस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर समोरील फलंदाजांना जखडून ठेवण्याची क्षमता त्याच्यात आहे. अचूक लेंथवर चेंडू टाकणे, नवीन चेंडूवर स्विंग देणे हीसुद्धा त्याची खासियत आहे. चेंडूला केव्हा उसळी द्यायची हे त्याला चांगले अवगत आहे. तिरंगी मालिकेत त्याची चुणक दिसली आहे.डेल स्टेन, दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकेचा हा गोलंदाज गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आला आहे. विरुद्ध संघाच्या फलंदाजांना ‘सळो की पळो’ करण्याची ताकद त्याच्या गोलंदाजीत आहे. नवीन चेंडूवर चांगल्या प्रकारे स्विंग करू शकतो. अचूक टप्पा आणि वेगावर नियंत्रण कसे ठेवायचे ही डेलची खासियत आहे. आॅस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्ट्यांवर तो जास्तच घातक बनतो. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स त्याचा कसा वापर करून घेतो हे महत्त्वाचे असणार आहे.