शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात होणार तीन गोकुल ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 04:46 IST

पालघर, पोहरा व ताथवड्यामध्ये गोकुल ग्राम उभारण्यात येतील. ज्यात गोवंश संशोधन केले जाते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत महाराष्ट्रात तीन गोकुलग्राम उभारणीसाठी निधी दिल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. हेमंत गोडसे यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. पालघर, पोहरा व ताथवड्यामध्ये गोकुल ग्राम उभारण्यात येतील. ज्यात गोवंश संशोधन केले जाते.शेतकऱ्यांना मदत नाहीचअवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र निधी देण्यात आला नसल्याचे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले. बाळू धानोरकरांनी विचालेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. राज्य आपत्ती निवारण निधीच्या दहा टक्के रक्कम शेतकºयांना देता येईल, असेही उत्तरात म्हटले आहे.नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजाणीची तयारी पूर्ण झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी धानोरकरांच्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले आहे. धोरणासाठी २ लाख सूचना आल्या. विविध राज्यांशी गतवर्षी चर्चा केल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात राज्यनिहाय कार्ययोजना आहे, अशी विचारणा खासदार धानोरकर यांनी केली होती. या संदर्भात लेखी उत्तरात मनुष्यबळ विकासमंत्री रमेश् पोखरीयाल यांनी ही माहिती दिली. नवे धोरण सर्वसमावेशक राहणार असून यासाठी कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या नव्या श्क्षिण धोरणात सर्व घटकांचे विचार केला गेला असल्याचेही, असेही लेखी उत्तरात म्हटले आहे.केळी नुकसानीचा प्रस्ताव नाहीजळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकºयांना मदतीची माहिती रक्षा खडसे यांनी विचारली. तापमान १० अंशाच्या खाली गेल्याने केळी पीकाला फटका बसला. ४० हजार ६०० हेक्टर पैकी पाच हजार हेक्टर पीकावर हा परिणाम दिसल्याचे त्यांनी प्रश्नात नमूद केले होते. मात्र केळी निर्यातीवर कोणताही प्रभाव दिसला नाही, शिवाय घटलेल्या तापमानामुळे नुकसान झाल्याचीही माहिती राज्याने कळवली नसल्याचे कृषी मंत्रालयाने उत्तरात स्पष्ट केले.>साखर कारखान्यांना अडीच हजार कोटीगतवर्षी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ७ हजार ४०३ कोटी रूपयांचे कर्ज दिले. देशातील ३४९ कारखान्यांना त्याचा लाभ झाला. महाराष्ट्रातील १३१ कारखान्यांना कर्जातून २ हजार ७५३ कोटी रूपये मिळाले. सर्वाधिक कारखाने व कर्ज महाराष्ट्रालाच मिळाले आहे. राजन विचारे यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला होता.