शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मालकीबाबत आज आणखी पुरावे देणार मार्केट जागा वाद : प्रधान सचिवांच्या आदेशावर उशिरापर्यंत चर्चा

By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST

जळगाव : मनपाच्या फुले, सेंट्रल फुले व शास्त्री टॉवर, वालेचा मार्केटची जागा महसूल विभागाची असल्याच्या महसूल विभागाच्या दाव्यासंदर्भात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने महापालिकेच्या विविध पुरावे सादर करण्यासंदर्भात आयुक्तांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत बैठक सुरू होती.

जळगाव : मनपाच्या फुले, सेंट्रल फुले व शास्त्री टॉवर, वालेचा मार्केटची जागा महसूल विभागाची असल्याच्या महसूल विभागाच्या दाव्यासंदर्भात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने महापालिकेच्या विविध पुरावे सादर करण्यासंदर्भात आयुक्तांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत बैठक सुरू होती.
मनपा व जिल्हाधिकारी कार्यालय या दोघांनी जागा भाडेप˜्याने दिली की मालकी हक्काने याबाबतचा पुरावा देणारे आणखी कागदपत्र सादर करण्याचे आदेश प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी यापूर्वी दिले होते.
मनपाचे महात्मा फुले, सेंट्रल फुले मार्केट व शास्त्री टॉवर मार्केट असलेली जागा शासनाची असल्याने यावरील मार्केटमधील गाळ्यांबाबत महसूल विभाग निर्णय घेईल, असा निर्णय शासनाने दिला आहे. मात्र मनपाने ही जागा महसूल विभागाने निरंतर वापरसाठी मनपाला दिलेली असून मनपाने कुठलाही शर्तभंग केलेला नाही. त्यामुळे ही जागा आता मनपाचीच असल्याचा दावा केला आहे. गेल्या महिन्यात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित केली होती. त्यात मनपातर्फे नगररचना साहाय्यक संचालक चंद्रकांत निकम तर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे साजिदखान पठाण हे उपस्थित होते. त्यांनी बाजू मांडून कागदपत्र व अहवाल सादर केले. सचिवांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेऊन कागदपत्रांचे अवलोकन केले. मात्र उपलब्ध कागदपत्रांवरून या जागा मालकी हक्काने दिल्या आहेत की भाडेप˜्याने याचा बोध होत नसल्याने पुराव्यासाठी दोन्ही बाजूंनी आणखी कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले.
शुक्रवारी कामकाज
याप्रश्नी शुक्रवारी ५ रोजी याप्रश्नी कामकाज होणार आहे. यावेळीदेखील मनपातर्फे सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम हे मुंबईत जाणार आहेत. द्यावयाचे पत्र व अन्य काही पुराव्यांसदर्भात १५ व्या मजल्यावर उशिरापर्यंत बैठक सुरू होती. आयुक्त कापडणीस, उपायुक्त जगताप, चंद्रकांत निकम व अन्य अधिकारी यासाठी उशिरापर्यंत थांबून होते.