शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नोकराच्या चौकशीतून दिशा मिळेल

By admin | Updated: January 10, 2015 00:10 IST

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती खा. शशी थरूर यांच्या नोकराची एसआयटीने चौकशी केली असून येत्या तीन चार दिवसांत निश्चितपणे ठोस काही निष्पन्न होईल,

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती खा. शशी थरूर यांच्या नोकराची एसआयटीने चौकशी केली असून येत्या तीन चार दिवसांत निश्चितपणे ठोस काही निष्पन्न होईल, असा दावा दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी केला आहे.विशेष तपास पथकाने(एसआयटी) सध्या या प्रकरणाचा प्रत्येक बाबीच्या अनुषंगाने तपास चालविला आहे. सुनंदांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी थरूर यांच्या नोकराने त्यांची भेट घेतली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता बस्सी म्हणाले की, अनेक बाबी घडणार असून लगेचच तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. आमच्या हाती ठोस काही लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला माहिती पुरवू. येत्या तीन ते चार दिवसांत तुम्हाला निश्चित असे काही कळवता येईल. एसआयटीकडून तपास सुरू असताना मला तपासाच्या प्रगतीबाबत नियमित माहिती दिली जाणार आहे, असे ते म्हणाले. पोलीस मुख्यालयाबाहेर त्यांना पत्रकारांनी गाठले होते.नोकराची काय केली चौकशी...एसआयटीने गुरुवारी थरूर यांच्या नोकराची चौकशी करताना त्याच्याकडून सुनंदा यांच्या मृत्यूच्या ४८ तास आधीच्या घडामोडींची माहिती घेतली. सुनंदाच्या शरीरावर जखमा होण्यापूर्वीच्या काळात तो कुणाला भेटला आणि त्याने काय केले याचा तपशील मिळविण्याचा या चौकशीत प्रयत्न झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)(लोकमत न्यूज नेटवर्क)४सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय दबावाविना आणि पूर्वनिष्पत्तीविना केला जावा, अशी मागणी त्यांचे पती खा.शशी थरूर यांनी केली आहे. थरूर यांनी या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. दिल्ली पोलिसांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांची उत्तरे देण्याची आपली तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.