शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला सात हजार भाव देऊ असे म्हटलेच नव्हते

By admin | Updated: October 31, 2015 22:44 IST

जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर्थातच कापसाला सात हजार भाव देण्याच्या मागणीच्या मुद्यावरून भाजपाने घूमजाव केले.

जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर्थातच कापसाला सात हजार भाव देण्याच्या मागणीच्या मुद्यावरून भाजपाने घूमजाव केले.
भंडारी म्हणाले, सरकारने अनेक कामे केली आहेत. ती दिसतील. सरकारबाबत विश्वासार्हता कायम आहे, असेही ते म्हणाले.
शेतकर्‍यांच्या सवलतींचा विचार करावा लागेल
हमीभावाची मागणी केली जाते. पण हमीभाव देऊन प्रश्न मीटतील असे नाही. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याचे ठरले तर शेतकर्‍यांना खते, विजबिल इतर कार्यक्रमाद्वारे दिल्या जाणार्‍या सवलतींचाही अंतर्भाव करावा लागेल, असेही ते म्हणाले. हमीभाव हा किचकट विषय आहे, असेही भंडारी म्हणाले.

शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे, सरकार पाच वर्षे चालेल
शिवसेना व भाजपातील वादांचा मुद्दा उपस्थित केला असता भंडारी म्हणाले, शिवसेनेने शांत, सोज्वळ स्वभावाच्या मुख्यमंत्र्यांना जोरदार पलटवार करण्याची वेळ आणली. सेनेतील नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पराभव समोर दिसत आहे. या पराभवाचे खापर आपल्यावर फुटेल, त्याचे पाप घेऊन फिरावे लागेल यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला. भाजपावर आरोप करणार्‍या शिवसेनेने आधी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत युतीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला.

घराणेशाहीवर बोलणे टाळले
पक्षात घराणेशाही सुरू झाली आहे. घराणेशाहीला विरोध करणार्‍या भाजपाचे धोरण बदलले की काय, असा मुद्दा छेडला असता हा मुद्दा आपण पुढे नेऊ, असे म्हणत भंडारी या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलले नाहीत.

आम्ही आंदोलन करायचो तेव्हा शौरी लवासातील बंगल्यात चैनेत राहायचे
विरोधात असताना आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्या वेळी अरूण शौरी हे लवासामधील आपल्या बंगल्यात चैनेत राहायचे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार गेल्यानंतर शौरी पक्षापासून दूर झाले. शौरी यांचा भाजपाशी कोणताही संबंध नाही, असा दावा भंडारी यांनी केला.