शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

पंतप्रधानपदाची अभिलाषा नव्हतीच

By admin | Updated: January 29, 2016 01:03 IST

पंतप्रधानपदाची अभिलाषा कधीच बाळगली नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी; इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हंगामी पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा होती, या दीर्घकाळापासून

नवी दिल्ली : पंतप्रधानपदाची अभिलाषा कधीच बाळगली नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी; इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हंगामी पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा होती, या दीर्घकाळापासून चालत असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम दिला आहे. अशाप्रकारच्या अफवा खोट्या आणि द्वेषपूर्ण असल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.‘द टर्ब्युलंट इयर्स : १९८०-९६’ या आपल्या जीवनचरित्राच्या दुसऱ्या खंडात मुखर्जी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन गुरुवारी नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात मुखर्जी म्हणतात, ‘माझी हंगामी पंतप्रधान बनायची इच्छा होती, त्या पदासाठी मी दावा केलेला होता आणि नंतर माझे मन वळविण्यात आले होते वगैरेसारख्या अनेक खोट्या गोष्टी पसरविण्यात आल्या. अशा खोट्या गोष्टींमुळेच राजीव गांधी यांच्या मनात गैरसमज निर्माण झाले होते. अशा गोष्टी पूर्णपणे खोट्या आणि द्वेषपूर्ण आहेत.’ रूपा प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. बाथरूममध्ये राजीव गांधी यांच्यासोबत पंतप्रधानपदाबाबत झालेल्या संभाषणाचा तपशीलही मुखर्जी यांनी या पुस्तकात लिहिला आहे. ‘वेळ पुढे सरकत होती आणि मला त्यांच्याशी बोलायची घाई झाली होती. मी त्यांच्याकडे (राजीव गांधी आणि सोनिया गांधी) गेलो आणि राजीव गांधींच्या खांद्यावर हळूच हात ठेवला आणि मला काही महत्त्वाचे बोलायचे आहे, असा संकेत दिला. ते सोनियांपासून दूर केले आणि माझ्याशी बोलले. गोपनीय मुद्दा असल्याशिवाय मी त्रास देणार नाही, हे समजल्यावर ते मला बाथरूममध्ये घेऊन गेले, कारण आम्ही कुणाच्याही लक्षात न येता बोलू शकू,’ असेही मुखर्जी यांनी यात नमूद केले आहे. यावेळी मुखर्जी आणि राजीव गांधी यांच्यात राजकीय परिस्थितीवर आणि राजीव यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याबाबत पक्षाच्या अन्य नेत्यांचे काय मत आहे याबाबत चर्चा झाली. त्यानंतर राजीव पंतप्रधान बनण्यास राजी झाले. त्यांचा निर्णय सर्वांना कळविला,’ असे मुखर्जी यांनी लिहिले आहे. - राजीव गांधी मंत्रिमंडळातून आणि त्यानंतर काँग्रेस पक्षातून काढण्याला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचाही ऊहापोह मुखर्जी यांनी यात केला आहे. ‘राजीव गांधींची वाढती नाराजी, त्यांच्या भोवतालच्या नेत्यांच्या मनातील वैर आणि संभाव्य कारवाईची पूर्वकल्पना आपल्याला आलेली होती. त्यांनी मला मंत्रिमंडळातून का वगळले आणि नंतर पक्षातून बडतर्फ का केले? यावर मी एवढेच सांगू शकतो की त्यांनी चूक केली. मीदेखील चुका केल्या. ते इतरांच्या प्रभावात आले आणि त्यांनी माझ्याविरुद्ध चुगली करणाऱ्यांचे ऐकले,’ असेही मुखर्जी यांनी या पुस्तकात स्पष्ट केले आहे.