नवीन सिन्हा, नवी दिल्ली - छोटे छोटे शेहरो से खाली बोर दोपहरों से हम तोह झोला उठाके चले... याची प्रचिती क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याच्याच झारखंडमधून अनपेक्षितपणे आलेल्या एका नेत्याच्या सोमवारी झालेल्या शपथविधीतून आली. झारखंडच्या दुर्गम भागातील आदिवासी खासदार सुदर्शन भगत यांच्याकडे अचानक मंत्रिपद चालून आले. मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून लॉबिंग, भेटीगाठी, गुजरात भवन, संघ कार्यालयात चकरा मारणार्यांच्या गर्दीत ते कुठेही नव्हते. खा. सुदर्शन भगत आपल्या मतदारसंघातील कामात व्यस्त होते. अचानक जिल्हाधिकार्यांना पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला. जिल्हाधिकारी कामाला लागले. खा. भगत दुर्गम आडवळणाच्या लोहेरडागा या गावी होते. धावपळ करीत जिल्हाधिकार्यांनी त्यांना निरोप दिला. मग भगत यांची लगबग सुरू झाली. त्यांनी रांचीचे विमानतळ गाठले. तेथे नियमित विमानसेवा नसल्यामुळे त्यांना खासगी विमानाने दिल्लीला आणण्यात आले. ही धावपळ त्यांना संध्याकाळी शपथविधीला हजर करण्यासाठी होती. झारखंडच्या टांग्राडिह या गावात जन्मलेले खा. भगत आता अचानक प्रकाशझोतात आले आहेत. दिल्लीत आले तेव्हा शपथविधीसाठी त्यांच्याकडे चांगले कपडेही नव्हते. त्याच कपड्यानिशी ते थेट मोदींना भेटण्यासाठी गेले. मग खादी आश्रमात जाऊन चांगले कपडे खरेदी केले.
कपडेही नव्हते अन् विमान आले घ्यायला !
By admin | Updated: May 28, 2014 04:25 IST