शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बिहारमध्ये योग दिनाचा सरकारी कार्यक्रम नाहीच

By admin | Updated: June 22, 2016 02:56 IST

संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना बिहार सरकारतर्फे मात्र एकही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता.

एस. पी. सिन्हा, पाटणासंपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना बिहार सरकारतर्फे मात्र एकही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. पाटण्याच्या गांधी मैदानात पतंजली योगपीठातर्फे योग दिन साजरा करण्यात आला. त्यात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यापासून भाजपाचे अनेक नेते सहभागी झाले होते. मात्र बिहार सरकारचा प्रतिनिधी त्यात नव्हता.केवळ योग दिन साजरा करून चालणार नाही. तो साजरा करण्याआधी देशभर दारूबंदी लागू करणे करजेचे आहे, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार गेले काही दिवस सातत्याने करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी तशी विनंती केली होती. सुदृढ राहायचे असेल, तर आधी दारू बंद करणे गरजेचे असून, त्यानंतरच योगाचा उपयोग आहे, असे त्यांचे म्हणणे असून, त्यांनी ते अनेक ठिकाणी बोलूनही दाखवले आहे. मात्र त्यांच्या दारूबंदीच्या विनंतीचा केंद्र सरकारने विचारही न केल्यामुळे त्यांनी सरकारतर्फे बिहारतर्फे योग दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार योगाचे निष्कारण राजकारण करीत आहे, त्या निमित्ताने सरकार स्वत:चाच प्रचार करीत असून, मोदी यांची प्रतिमा उंचावण्याचा हा प्रयत्न अयोग्य आहे, अशी टीका संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते संजयसिंह यांनी केली. योग दिन आयोजित न केल्याबद्दल आणि पाटण्यातील कार्यक्रमात सरकारतर्फे कोणीही हजर न राहिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने नितीशकुमार यंच्यावर कडाडून टीका केली. नितीशकुमार संकुचित राजकारण करीत असल्याचा आरोप भाजपाने केला. गांधी मैदानात भाजपाचे नेते व कार्यकर्ते यांचाच सहभाग अधिक होता. (वृत्तसंस्था)बिहारने २१ जून हा विश्व संगीत दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त पाटण्यात शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फ्रान्समध्ये २१ जूनला विश्व संगीत दिन आयोजित केला जातो.