शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्टअप्सच्या दुखण्यावर उतारा नाही!

By admin | Updated: February 1, 2017 19:36 IST

स्टार्टअप्सना ७ वर्षे कर सवलत देण्याच्या आणि या नवउद्योगांना नुकसान झालेच तर ते १५ वर्षे कॅरीफॉरवर्ड करण्याच्या निर्णयाचें स्वागत करायला हवे

-मंदार भारदे (व्यवस्थापकीय संचालक, मॅब एव्हिएशन)

मुंबई, दि. 1 - स्टार्टअप्सना ७ वर्षे कर सवलत देण्याच्या आणि या नवउद्योगांना नुकसान झालेच तर ते १५ वर्षे कॅरीफॉरवर्ड करण्याच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. त्यातून नव उद्योगांना बळ मिळेल असें अर्थमत्र्यांना वाटत असेलही. मात्र, त्यापलिकडे नवउद्योगांचे काही प्रश्न आहेत, ज्याबाबत या अर्थसंकल्पात काहीही ठोस विचार केलेला दिसत नाही. त्यातलाच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कुणाही तरुणाला उद्योजक बनण्याची इच्छा असेल तरी भांडवल कोण देणार? मोठे भांडवल मिळण्याची काहीही सोय किंवा तरतूद या अर्थसंकल्पाने केलेली नाही. मुद्रा बॅँक असली तरी त्यातून केवळ दहा लाख रुपये भांडवल मिळते. त्यातून अगदी छोटे उद्योग उभे राहू शकतात. मात्र ज्यांच्याकडे मोठी संकल्पना आहे, त्यातून मोठा उद्योग सुरु करण्याची इच्छा आहे त्यांना इतक्या कमी भांडवलाचाही काहीही उपयोग नाही. नवउद्योगांना ताकद द्यायची तर भांडवलाची सोय कोण करणार हा प्रश्न या अर्थसंकल्पात अनुत्तरीतच राहतो. त्यानंतरचा प्रश्न आहे तो बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी प्रत्यक्ष करांत काही सवलत देण्याचा. त्याने उत्पादन किंमत कमी होवू शकली असती आणि नव उद्योगांना पाठिंबा म्हणून ते मोठे योगदान ठरले असते, पण तसेंही या अर्थसंकल्पानें काही केलेले नाही. त्यामुळे नवउद्योगांना अपेक्षित बळ मिळू शकलेले नाही.आणि नवउद्योगांसाठीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो बौद्धिक संपदेचा. वारंवार हे दिसते, की नवउद्योजक या बौद्धिक संपदा हक्कांच्या संदर्भात त्रासतात. जो उद्योगांना भांडवल देतो त्याच्याकडे त्या कल्पनचा स्वामित्व हक्क ( पेटंट) जातो. किंवा मग भांडवल उभारणीसाठी म्हणून हे उद्योजक पेटंटचे हक्क देऊन टाकतात. त्या हक्कांसाठी काही ठोस तरतूद या अर्थसंकल्पात अपेक्षित होती. त्याचा विचार केला गेलेला नाही.