शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदुत्वा’च्या आधी केलेल्या व्याख्येचा फेरविचार नाही - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: October 26, 2016 01:16 IST

हिंदुत्व’ हा शब्द हिंदू धर्माशी संबंधित नसून तो हिंदू समाजाच्या जीवनशैलीशी संबंधीत आहे, या २० वर्षांपूर्वी केलेल्या व्याख्येचा कोणताही फेरविचार केला जाणार नाही,

नवी दिल्ली : ‘हिंदुत्व’ हा शब्द हिंदू धर्माशी संबंधित नसून तो हिंदू समाजाच्या जीवनशैलीशी संबंधीत आहे, या २० वर्षांपूर्वी केलेल्या व्याख्येचा कोणताही फेरविचार केला जाणार नाही, असा खुलासा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केला.सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर, न्या. मदन बी. लोकूर, न्या. शरद बोबडे, न्या. अनिल कुमार गोयल, न्या. उदय लळित, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्वर राव या सात न्यायाधीशांच्या विशेष पीठापुढे कामकाज सुरु होताच काही पक्षकारांनी सुनावणीत सहभागी होण्यास अर्ज केले तेव्हा न्यायालयाने हे स्पष्टिकरण केले.सरन्यायाधीश न्या. ठाकूर म्हणाले की, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सूचना करताना जो ‘रेफरन्स’ केलेल्या चौकटीत सध्याची सुनावणी होईल. ‘रेफरन्स’च्या त्या निकालपत्रात ‘हिंदुत्वा’चा कुठेही उल्लेख नाही. तसा उल्लेख दाखवून दिले तर आम्ही त्याचा त्यावेळी विचार करू. तूर्तास तरी ‘हिंदुत्व’ म्हणजे काय याचा विचार करणार नाही वा १९९५ मधील ज्या निकालात ही व्याख्या केली गेली त्याचा फेरविचार करणार नाही.न्यायालयाने स्पष्ट केले की, या सुनावणीत खास करून लोकप्रतिधित्व कायद्याच्या कलम १२३(३) अन्वये निषिद्ध ठरविलेल्या भ्रष्ट प्रचार मार्गावर विचार करणार आहोत. यानुसार धर्माच्या नावे मते मागणे हा निवडणूक गुन्हा ठरविण्यात आला असून तो सिद्ध झाल्यास उमेदवाराची निवडणूक रद्द करण्याची तरतूद आहे. याच अनुषंगाने धार्मिक नेत्यांचा लोकांवरील प्रभाव लक्षात घेऊन उमेदवाराने प्रचारात त्यांना उतरविणे हेही कलम १२३(३)च्या कक्षेत येते का, याचा आम्ही विचार करू.भाजपाचे मुंबईतील तत्कालीन आमदार डॉ. रमेश प्रभू यांची निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाने ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्यावर रद्द केली होती. त्यावर प्रभू यांनी केलेल्या अपिलाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ‘हिंदुत्वा’ची वरीलप्रमाणे व्याख्या केली होती. ११ डिसेंबर १९९५ रोजी न्यायालयाने ‘हिदुत्वा’वर दिलेल्या निकालाचा आमुलाग्र फेरविचार करावा, असा सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड, रंगकर्मी व लेखक शमसूल इस्लाम व ज्येष्ठ पत्रकार दिलिप मंडल यांनी अर्ज केला होता. मात्र या अर्जासह इतरही असे अर्ज ऐकण्यास नकार दिला.