शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वाहनांचे आयुष्य निश्चित करण्याची योजना नाही!

By admin | Updated: May 4, 2016 03:12 IST

वाहनांचे आयुष्य निश्चित करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. तसेच वाहन पंजीयन प्रमाणपत्राच्या वैधतेत काही बदल करण्याचाही सरकारचा इरादा नाही, असे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग

- प्रमोद गवळी ल्ल नवी दिल्ली

वाहनांचे आयुष्य निश्चित करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. तसेच वाहन पंजीयन प्रमाणपत्राच्या वैधतेत काही बदल करण्याचाही सरकारचा इरादा नाही, असे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले.खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ते पुढे म्हणाले, मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ४१ (७) अन्वये बिगर-परिवहन वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र १५ वर्षांसाठी वैध असते. वाहनाच्या फिटनेसमध्ये काही दोष नसतील तर प्रमाणपत्राची मुदत आणखी पाच वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते.नॅशनल परमिटचे नियम१२ वर्षांपेक्षा जास्त जुन्या एक्सेलरहित मालमोटारीला राष्ट्रीय परमिट दिले जाणार नाही, अशी परिवहन वाहनांसाठी असलेल्या केंद्रीय मोटार वाहन नियमावली- १९८९ मधील कलम ८८ च्या उपनियम १ ते ४ मध्ये तरतूद केली आहे. तसेच मल्टी एक्सल असलेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या मालमोटारीलाही परमिट दिले जाणार नाही. ५० टनापेक्षा जास्त वजनाचा माल वाहून नेणाऱ्या २५ वर्षे जुन्या वाहनांनाही परमिट देता येत नाही.आकार आणि बनावटमोटार वाहनांना कारखान्यामधून देशाच्या विविध विक्री आऊटलेटपर्यंत नेण्यासाठी आॅटोमोबाईल निर्मात्यांद्वारे तैनात करण्यात आलेल्या ट्रेलर वाहनांचा आकार आणि बनावट प्रमाणित करताना केंद्र सरकारने त्याबाबत १८ एप्रिल २०१६ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे, अशी माहिती राधाकृष्णन यांनी दिली.दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी आणि समितीची स्थापनाखा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी म्हणाले, ३१ मार्च रोजी झालेल्या टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यानंतर १ एप्रिल रोजी श्रीनगरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) स्थानिक आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये संघर्ष झाला होता. पोलीस आणि प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर तेथील परिस्थिती पूर्ववत झाली. परंतु ५ एप्रिल रोजी स्थानिक विद्यार्थ्यांनी पुन्हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास मज्जाव केला. यावेळी विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात संघर्ष उडाला. पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यात सात विद्यार्थी जखमी झाले. या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने दंडधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे आणि प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि तथ्य शोधण्यासाठी एक समितीही नियुक्त केली आहे.